लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आॅनलाईन स्मार्ट फोन खरेदी करणाऱ्या एका युवकाला खाली डबा पाठवून फसवण्यात आले.प्रेमचंद राऊत रा. सरस्वतीनगर, हुडकेश्वर असे फिर्यादीचे नाव आहे. प्रेमचंद एमआर आहे. ११ जानेवारी रोजी त्याने इंटरनेट साईटवर आय फोन विक्रीची जाहिरात पाहिली. जाहिरातीत दिलेल्या मोबाईलवर संपर्क साधला. तेव्हा २२ हजार रुपयात मोबाईल खरेदीचा सौदा करण्यात आला. जाहिरात देणाऱ्याने तो जालना येथे पोलीस कर्मचारी असल्याचे सांगितले. त्याने प्रेमचंदला सांगितले की, त्याच्या भावाची प्रकृती खराब आहे. उपचारासाठी पैशाची गरज असल्याने तो मोबाईल विकत आहे. त्याने प्रेमचंदकडून मोबाईलची अर्धी रक्कम वसूल केली. यानंतर उर्वरित रक्कम पेटीएम करायला सांगितली. परंतु प्रेमचंदने मोबाईल हाती आल्यावर अर्धी रक्कम देईल, असे सांगितले. तेव्हा आरोपीने तो पोलीस कर्मचारी असून आपले आय कार्ड, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड आदी सर्व सांगून डिलिव्हारीसाठी निश्चिंत राहण्यास सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून प्रेमचंदने २२ हजार रुपये जमा केले. १३ फेब्रुवारी रोजी प्रेमचंदला कुरिअरने पार्सल आले. उघडून पाहिले असता बॉक्स खाली होता. यानंतर जेव्हा प्रेमचंदने मोबाईलवर संपर्क साधला असता, त्याला कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. फसवले गेल्याचे लक्षात येताच प्रेमचंदने हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
आॅनलाईन फसवणूक ; मागवला स्मार्ट फोन, मिळाला खाली डबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2018 10:59 AM
आॅनलाईन स्मार्ट फोन खरेदी करणाऱ्या एका युवकाला खाली डबा पाठवून फसवण्यात आले.
ठळक मुद्दे२२ हजाराचा फटका