लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना नियंत्रण उपाययोजनांतर्गत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये आता ४ एप्रिलपर्यंत ऑनलाईन कामकाज केले जाणार आहे. यासंदर्भात शुक्रवारी नोटीस जारी करण्यात आली. ऑनलाईन कामकाजात केवळ अत्यावश्यक प्रकरणे ऐकली जातील.
गेल्या १२ मार्च रोजी १५ ते १९ मार्चपर्यंत ऑनलाईन कामकाजाची नोटीस जारी करण्यात आली होती. वर्तमान परिस्थिती पाहता ऑनलाईन कामकाजाचा काळ वाढविण्यात आला आहे. नवीन नोटीसनुसार, २२, २३, ३० मार्च व १ एप्रिल रोजी न्यायमूर्तीद्वय प्रसन्न वराळे व नितीन सूर्यवंशी यांचे न्यायपीठ सर्व फौजदारी अपील्स व फौजदारी याचिका, २२, २४, २५, ३० मार्च व १ एप्रिल रोजी न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अविनाश घरोटे यांचे न्यायपीठ सर्व दिवाणी रिट याचिका व सर्व प्रकारच्या जनहित याचिका, २२, २४, ३० मार्च व १ एप्रिल रोजी न्या. विनय देशपांडे दिवाणी रिट याचिका, दिवाणी रिव्हिजन अर्ज, नियमित जामीन अर्ज, न्या. स्वप्ना जोशी द्वितीय अपील्स, किरकोळ दिवाणी अर्ज, सीआरपीसी कलम ४०७ अंतर्गतचे अर्ज, अटकपूर्व जामीन अर्ज, २३ व ३१ मार्च रोजी न्यायमूर्तीद्वय झेड.ए. हक व अमित बोरकर यांचे न्यायपीठ फौजदारी रिट याचिका व फौजदारी अपील्स, २३, २५ व ३१ मार्च रोजी न्या. रोहित देव अटकपूर्व जामीन अर्ज, फौजदारी रिट याचिका, सीआरपीसी कलम ४८२ अंतर्गतचे अर्ज, न्या. विनय जोशी नियमित जामीन अर्ज, फौजदारी अपील्स, फौजदारी रिव्हिजन अर्ज, २४ व ३१ मार्च रोजी न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व श्रीराम मोडक यांचे न्यायपीठ प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क अर्ज, संदर्भ व अपील्स, लेटर्स पेटेन्ट अपील्स, प्रथम अपील्स, कुटुंब न्यायालय अपील्स, अवमानना अपील्स, अवमानना याचिका तर, २५ मार्च रोजी न्या. श्रीराम मोडक हे प्रथम अपील्स व अपील्स अगेन्स्ट ऑर्डरचे कामकाज पाहतील.