शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी राष्ट्रपतींचा मोठा निर्णय; जम्मू काश्मीरच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा मार्ग मोकळा केला
2
जयशंकर पोहोचण्यापूर्वी इस्लामाबादमध्ये लष्कर तैनात; पाकिस्तानात दंगे भडकले
3
हिजबुल्लाहचा इस्रायलवर भीषण ड्रोन हल्ला; चार सैनिकांचा मृत्यू, ६० हून गंभीर जखमी
4
आजचे राशीभविष्य: ७ राशींना अनुकूल, धनलाभ योग; नोकरीत शुभवार्ता, प्रसन्नतेचा दिवस
5
एकत्र फोटोमुळे आरोपींची ओळख पटवण्यात आले यश
6
बिश्नोई गँगने स्वीकारली बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी? फेसबुक पोस्ट व्हायरल; आरोपी म्हणाला- 'मै १७ साल का...'
7
महाविकास आघाडीने केला ‘गद्दारांचा पंचनामा’; संयुक्त पत्रकार परिषदेतून महायुती सरकारवर निशाणा
8
कोजागरी नवान्न पौर्णिमा: ५ राशींना अनुकूल, नोकरी-व्यापारात यश; इच्छापूर्ती, सुख-सौभाग्य काळ!
9
गुरुचरित्र आपल्याला नेमके काय शिकवते? ११ गोष्टी कालातीत, आजही येते प्रचिती; पाहा, गुरुपदेश
10
सणासुदीत प्रशासनाचे हात केळी खायला जातात?
11
तुरुंगातून बाहेर येताच आखला बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट; मुंबई, पुण्यात राहून रेकी, अडीच ते तीन लाखांची सुपारी
12
निवडणूक आचारसंहिता कधी लागू होणार? वेगवेगळ्या दाव्यांमुळे उत्सुकता वाढली; आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक
13
‘सीएम’पदासाठी कोण? हे आधी महायुतीने सांगावे! मविआच्या नेत्यांचे सूर जुळले; आधीच्या चर्चांना पूर्णविराम
14
काँग्रेस नेते आज दिल्ली दरबारी; आढावा घेणार
15
धानाला हेक्टरी २५ हजार रुपये बोनस देणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही 
16
लाडक्या बहिणींची गर्दी पाहून ‘त्यांच्या’ छातीत धडकी : मुख्यमंत्री
17
"उद्धव ठाकरे इतिहासातून बाहेरच येत नाहीत", राज ठाकरे यांचा निषाणा; ‘पुष्पा’ असा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांवरही टीका
18
CM शिंदेंनी शिवसेनेचा पहिला उमेदवार केला जाहीर, जयस्वालांना 'या' मतदारसंघातून तिकीट
19
Shubham Lonkar: अकोल्याचा शुभम वर्षभरापासून लॉरेन्स टोळीच्या संपर्कात
20
पुण्यात काँग्रेसमध्ये तिकिटासाठी गर्दी! २१ विधानसभा मतदारसंघासाठी झाल्या मुलाखती

आॅनलाईन सातबारा यंत्रणा ठप्प शेतकऱ्यांवर भुर्दंड : ग्रामीण तहसील कार्यालयातील प्रकार

By admin | Published: February 27, 2016 3:31 AM

शेतकऱ्यांना सातबारा आॅनलाईन उपलब्ध करून देण्याची यंत्रणा जिल्हा प्रशासनाने निर्माण केली. याचे चांगले परिणामही दिसून येऊ लागले

नागपूर : शेतकऱ्यांना सातबारा आॅनलाईन उपलब्ध करून देण्याची यंत्रणा जिल्हा प्रशासनाने निर्माण केली. याचे चांगले परिणामही दिसून येऊ लागले. परंतु नागपूर ग्रामीण तहसील कार्यालयातील आॅनलाईन सातबारा यंत्रणा गेल्या अनेक दिवसांपासून ठप्प पडली आहे. याचा भुर्दंड मात्र दूरवरून येणाऱ्या शेतकऱ्यांवर पडत आहे. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात सर्वत्र आॅनलाईन सातबारा उपलब्ध करून देण्यात येत आहे. एका दिवसात सातबारा मिळत असल्याने शेतकरी याचा चांगला लाभ घेत आहेत. नागपूर ग्रामीण तहसील कार्यालयात सुद्धा ही यंत्रणा कार्यरत आहे. परंतु मागील काही दिवसांपासून ही यंत्रणा ठप्प पडली आहे. शेतकरी ग्रामीण तहसील कार्यालयात येत आहेत, आणि त्यांना यंत्रणा बंद पडल्याचे कारण सांगून बाहेर पाठविले जात आहे. बाहेरून आॅनलाईन अर्ज भरून आणल्यावर तहसील कार्यालयात सही शिक्का दिला जातो. परंतु यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक भुर्दंड बसत आहे. तहसील कार्यालयात केवळ २३ रुपये भरून आॅनलाईन सातबारा उपलब्ध होतो. सध्या ही यंत्रणा ठप्प आहे. कार्यालयाबाहेर मात्र आॅनलाईन सातबारा अर्ज तयार करून दिले जात आहे. एका व्हॅनमध्ये झेरॉक्स मशीनसह आॅनलाईन सातबारासह सर्व सुविधा उपलब्ध आहे. तहसील कार्यालयात आलेल्या शेतकऱ्याला बाहेर अशी सुविधा उपलब्ध असल्याचे कार्यालयातूनही सांगितले जाते. शेतकरी सुद्धा गावी परत जाण्याऐवजी त्याचा लाभ घेण्याचा निर्णय घेतो. यात त्याला अधिकचे पैसे मोजावे लागत आहे. आॅनलाईन अर्ज करून देण्यासाठी ६० रुपये घेतले जातात. एखाद्या दलालाच्या हाती लागले तर तो १५० ते २०० रुपये सांगतो. अशा प्रकारे २३ रुपयाऐवजी शेतकऱ्यांना १५० ते २०० रुपये खर्च करावे लागत आहे.(प्रतिनिधी)