लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कारवाईवर आक्षेप घेणाऱ्यांपैकी केवळ ३६५ अनधिकृत धार्मिकस्थळांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात पैसे जमा केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या प्रकरणावर गुरुवारी न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व मुरलीधर गिरटकर यांच्यासमक्ष सुनावणी होणार असून त्यानंतर ते कोणता आदेश देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.यासंदर्भात न्यायालयात मनोहर खोरगडे व डॉ. गजानन झाडे यांची जनहित याचिका प्रलंबित आहे. मनपाने अनधिकृत धार्मिकस्थळांना कारवाईची नोटीस बजावली आहे. त्यामुळे वादातील धार्मिकस्थळांनी मनपाकडे १८२७ आक्षेप दाखल केले आहेत. न्यायालयाने २ आॅगस्ट रोजी आक्षेपकर्त्या धार्मिकस्थळांना प्रत्येकी ५० हजार रुपये जमा करण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर ही रक्कम वेळेवर जमा करणाऱ्यांना सोडून उर्वरित धार्मिकस्थळांना २१ आॅगस्टपर्यंत प्रत्येकी ६० हजार रुपये जमा करण्याचा आदेश देण्यात आला होता. या आदेशांनुसार एकूण ३६५ अनधिकृत धार्मिकस्थळांनी न्यायालयात पैसे जमा केल्याची माहिती मिळाली आहे. न्यायालयाने पैसे जमा करणाऱ्या अनधिकृत धार्मिकस्थळांना त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याची ग्वाही सध्या दिलेली नाही. यासंदर्भात गुरुवारी चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
केवळ ३६५ अनधिकृत धार्मिकस्थळांनी जमा केले पैसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 9:57 PM
कारवाईवर आक्षेप घेणाऱ्यांपैकी केवळ ३६५ अनधिकृत धार्मिकस्थळांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात पैसे जमा केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या प्रकरणावर गुरुवारी न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व मुरलीधर गिरटकर यांच्यासमक्ष सुनावणी होणार असून त्यानंतर ते कोणता आदेश देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ठळक मुद्देहायकोर्टात आज सुनावणी : पुढील आदेशाकडे सर्वांचे लक्ष