लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा सतत वाढत असून दररोज तीन ते साडेतीन हजार नव्या रुग्णांची भर पडत आहे. गुरुवारपर्यंत नागपूर शहर व जिल्ह्यात तब्बल ३४ हजार ८१९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आजवर ४ हजार ७८४ जणांचा मृत्यू झाला आहे. असे असताना नागपूर शहरातील शासकीय व खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी फक्त ४९४ बेड रिकामे आहेत. यात ऑक्सिजनचे ३६७, आयसीयूतील ५९ तर व्हेंटिलेटरचे ६८ बेड रिकामे आहेत. यात खासगी ७९ रुग्णालयांत ऑक्सिजनचे १२८, आयसीयू बेड २५, व्हेंटिलेटरचे १८ बेड खाली आहेत. तर शासकीय रुग्णालयात ऑक्सिजनचे २३९, आयसीयू बेड ३४ तर व्हेंटिलेटरचे ५० बेड रिकामे आहेत. महापालिकेने गुरुवारी सायंकाळी कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती बेड उपलब्ध आहेत, याची यादी जारी केली आहे.