नागपूर : दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षांबाबत असलेल्या अडचणींचे थेट व तत्काळ निराकरण होण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे ‘शाईन ॲप’ तयार करण्यात आले आहे. परंतु आतापर्यंत यासंदर्भात विद्यार्थ्यांकडून हवा तसा पुढाकार घेण्यात आलेला नाही. ४०० ते ५०० विद्यार्थ्यांनीच हे ॲप डाऊनलोड केले असल्याची माहिती सूचना व तंत्रज्ञान अधिकारी हरीश अय्यर यांनी दिली आहे. विद्यार्थ्यांनी एकदा ॲपवरून सर्व सूचना व माहिती वाचून घ्यावी. त्यानंतर अडचण आल्यास ॲपवरूनच तज्ज्ञांव्दारे शंका निरसन करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. या ॲपव्दारे दहावी व बारावीच्या परीक्षेबाबत असणाऱ्या शंका विद्यार्थी विचारू शकतील. हे ॲप मराठी व इंग्रजी या भाषेमध्ये उपलब्ध आहे. या ॲपमध्ये परीक्षाचे वेळापत्रक, वारंवार विचारले जाणारे प्रश्न, महत्त्वाचे संकेतस्थळ, अद्ययावत बातम्या, विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक सूचना आदींचा समावेश असणार आहे.
५०० विद्यार्थ्यांनीच डाऊनलोड केले शाईन ॲप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 4:08 AM