लोगो वापरावा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत टेंडर शुअर प्रकल्प राबविला जात आहे. यात ५३ किलोमीटर लांबीच्या प्रमुख रस्त्यांचा समावेश आहे; मात्र मागील तीन वर्षांत फक्त २६ टक्के म्हणजेच १२.३६ किलोमीटर रस्त्यांचे काम करण्यात आले आहे. सध्या रस्त्यांची कामे सध्या ठप्पच आहे.
प्रोजेक्ट टेंडरशुअर प्रकल्प पूर्व नागपुरातील भरतवाडा, पारडी, पुनापूर या भागातील १७३० एकर परिसरात उभारला जात आहे. ६५० कोटींचा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे १ लाख १३ हजार लोकांना फायदा होणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा एकात्मिक पद्धतीने मिळतील. रोजगारांच्या संधी निर्माण होतील. परिसरात २४ बाय ७ पाणीपुरवठा व परिसरात कार्यक्षम घनकचरा व्यवस्थापन राहील असा दावा केला आहे. ५२ किलोमीरचे रस्ते, २९ पुलांचे निर्माण, ७ हजार एलईडी पथदिवे, मल: निस्सारण, आदींचा समावेश आहे. मात्र, प्रकल्प सध्या तरी कागदावरच आहेत. प्रकल्प भागात लोकमत चमूने भेट दिली असता एक-दोन कामे वगळता सर्वच कामे ठप्प असल्याचे दिसून आले.
१ लाख १३ हजार लोकांना या प्रकल्पाचा लाभ होणार असल्याचा दावा राजकीय नेत्याकडून केला जात आहे. मात्र, असे कुठेही दिसत नाही. रोजगाराच्या संधी निर्माण होणार असल्याचा दावा केला असला तरी सध्या दूरदूरपर्यत रोजगाराच्या संधीचा ठावठिकाणा लागत नाही. रस्त्यांचे निर्माण न झाल्याने सात हजार एलईडी पथदिवे, मल:निस्सारण अजूनही कागदावच आहे.
...
तीन वर्षांनंतरही जलकुंभाचे काम अर्धवट
पुनापूर वीटभट्टी परिसरात दोन व दुर्गानगर परिसरात दोन जलकुंभ उभारले जात आहे. दुर्गानगर येथील जलकुंभांचे काम सुरू आहे. वीटभट्टी परिसरात दोन वर्षापूर्वी फक्त कामाला सुरुवात झाली. काही दिवसांत बंद पडलेले दोन जलकुंभांचे काम अजूनही सुरू झालेले नाही.
...