शहरं
Join us  
Trending Stories
1
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
2
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
3
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
4
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
5
Vinod Tawde: तावडे आलेल्या त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
6
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
7
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
8
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
11
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
12
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
13
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
14
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
15
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
16
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
17
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
18
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
19
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

प्रत्यक्ष सहभाग घेतल्यावरच संघ कळतो

By admin | Published: May 16, 2017 2:10 AM

पाण्यामध्ये उतरल्याशिवाय पोहणे शिकता येत नाही. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष सहभागी होऊन कार्य केल्याशिवाय संघ कळत नाही, ...

दत्तात्रय होसबोळे यांचे मत : संघ शिक्षा वर्गाला सुरुवातलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाण्यामध्ये उतरल्याशिवाय पोहणे शिकता येत नाही. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष सहभागी होऊन कार्य केल्याशिवाय संघ कळत नाही, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह-सरकार्यवाह दत्तात्रय होसबोळे यांनी व्यक्त केले.रेशीमबागेतील डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरात सोमवारपासून तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाला सुरुवात झाली. याप्रसंगी बोलताना त्यांनी संघाचे महत्त्व सांगितले. पुस्तके वाचल्याने, पुस्तके लिहिल्याने किंवा संशोधन केल्यामुळे संघ कळत नाही. संघाला समजण्यासाठी संघाचे कार्य करणे आवश्यक आहे. स्नेह, आत्मियता, समर्पण व नि:स्वार्थी भाव या गुणांमुळे स्वयंसेवक राष्ट्रीय जीवनाचे केंद्रबिंदू झाले आहेत. समाजाची गरज पूर्ण करण्यासाठी व संकटावर मात करण्यासाठी जी शक्ती संघटित होऊन परिचित व अपरिचितांचे सद्भावपूर्वक स्वागत करते तिलाच स्वयंसेवक म्हणतात, असे होसबोळे यांनी सांगितले.सर्वाधिकारी पृथ्वीराज सिंह यांनी संघ परिसरात आल्यानंतर दायित्व व जबाबदाऱ्यांमध्ये वाढ होते, असे मत व्यक्त केले तर, पालक अधिकारी अनिल ओक यांनी जगामध्ये सर्वजन विनाशाची भाषा बोलत असल्यामुळे आज शीलासोबत शक्तीही आवश्यक असल्याचे सांगितले.कार्यक्रमात प्रामुख्याने अखिल भारतीय सह-सरकार्यवाह भागय्या, बौद्धिक प्रमुख स्वांत रंजन, शारीरिक प्रमुख सुनील कुलकर्णी, सह-शारीरिक प्रमुख जगदीश प्रसाद, व्यवस्था प्रमुख मंगेश भेंडे, सेवा प्रमुख पराग अभ्यंकर, कुटुंब प्रबोधन प्रमुख सुब्रमण्यम, वर्ग कार्यवाह रमेश काचम, मुख्य शिक्षक गंगा विष्णू, बौद्धिक प्रमुख रवींद्र किरकोले, सह-बौद्धिक प्रमुख सुनील देव, सेवा प्रमुख नवल किशोर, व्यवस्था प्रमुख दिलीप हाडगे उपस्थित होते. वर्गाचा समारोप ८ जून रोजी होईल.