शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषद, महामंडळ देतो; अर्ज मागे घ्या... मविआत बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न!
2
रशियानं गुगलला ठोठावला असा दंड की तुम्हीही चक्रावून जाल, एवढा पैसं संपूर्ण पृथ्वीवरही नाही! काय आहे प्रकरण? 
3
बंडखोर ऐकेनात, मनधरणीसाठी महायुतीच्या नेत्यांचा कस; माघारीसाठी काय रणनीती?
4
अयोध्येत २५ लाख दीपोत्सवाचा विश्वविक्रम... १,१२१ जणांनी एकाच वेळी केली आरती 
5
आजचे राशीभविष्य, ३१ ऑक्टोबर २०२४: आर्थिक लाभ संभवतात, कौटुंबिक वातावरण आनंदी असेल!
6
सोने लक्ष्मीपूजनापूर्वीच प्रथमच गेले ८० हजारांवर; चांदीनेही खाल्ला भाव
7
"डाेनाल्ड ट्रम्प अस्थिर, प्रतिशोधाने पछाडलेले...", शेवटच्या भाषणात कमला हॅरिस यांचा हल्लाबोल
8
शरद पवार हे घरे फोडण्याचे जनक : देवेंद्र फडणवीस
9
इस्रायलचा हल्ला, गाझात ८८ जण ठार; अन्न, पाण्यासह औषधांचीही चणचण
10
स्वदेशी संस्थांनी केली ४.६ लाख कोटींची गुंतवणूक, शेअर बाजारात सार्वकालिक उच्चांक
11
पोलिसांनी एसी, कॉम्प्युटर, टीव्ही फुकट घेतले; पैसे मागितल्यानंतर वापरलेल्या वस्तू केल्या परत 
12
दोन ठिकाणांवरील भारत, चीन सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण
13
भाजप बंडखोर उमेदवार विशाल परब यांच्या गाडीवर हल्ला 
14
डिजिटल ट्विन - तुम(चेच विचार, तुमचाच आवाज, डिट्टो तुम्हीच!
15
‘संविधानदिनी’ १४१ कच्च्या कैद्यांची सुटका?
16
कार्यकर्त्याला आमदार होण्याची स्वप्ने, त्याचाच परिणाम गुणवत्ता नसलेल्या भारंभार उमेदवारांची गर्दी
17
जागा मिळविण्यात काँग्रेस, भाजप आघाडीवर; दोन ठिकाणी तिढा
18
मतदान करायचेय, आधी थोडं फिरून येऊ! सुट्ट्यांमुळे ‘एमटीडीसी’चे रिसाॅर्ट १५ नोव्हेंबरपर्यंत फुल
19
मुंबईत ३६ मतदारसंघांत दाखल झालेल्या ६२५ उमेदवारी अर्जांपैकी ४७२ अर्ज ठरले वैध
20
त्यांना दिवसातून तीनदा मीच का दिसतो? फडणवीसांचा सवाल; जरांगे पाटलांनीही दिलं प्रत्युत्तर!

"राज्यात भाजपा नेत्यांचा 'दिलासा' घोटाळा", संजय राऊत नेमकं काय सूचवू पाहताहेत?; पाहा Exclusive मुलाखत 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 11:18 PM

राज्यात महाविकास आघाडीच्या निर्मितीचे महत्वाचे शिलेदार आणि शिवसेना खासदार संजय राऊत सध्या नागपूर दौऱ्यावर आहेत.

नागपूर-

राज्यात महाविकास आघाडीच्या निर्मितीचे महत्वाचे शिलेदार आणि शिवसेना खासदार संजय राऊत सध्या नागपूर दौऱ्यावर आहेत. शिवसंपर्क अभियानाअंतर्गत ते नागपूरच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी संजय राऊत यांनी 'लोकमत'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत भाजपावर हल्ला चढवताना एक नवा आरोप केला आहे. महाराष्ट्रात भाजपा नेत्यांचा दिलासा घोटाळा सुरू असल्याचं विधान संजय राऊत यांनी केलं आहे. भाजपा नेत्यांविरोधात पुरावे असतानाही अद्याप कारवाई का झालेली नाही असं संजय राऊत यांना विचारण्यात आलं. "पोलीस आपलं काम करत आहेत आणि कारवाई सुरू झालेली आहे. पण भाजपा नेत्यांचा 'दिलासा' घोटाळा सुरू आहे", असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. भाजपा नेत्यांना कोर्टात गेल्यावर लगेच दिलासा मिळतो हाच मोठा घोटाळा असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. 

"भाजपाचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याविरोधात मुंबै बँकेतील घोटळ्यासंबंधी गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस आपलं काम करत आहेत. त्यांनी आधीच कोर्टात जाऊन अटकपूर्व जामीन मिळवला आहे. भाजपा नेते कोर्टात जाऊन कारवाईला कशी स्थगिती आणता येईल यासाठी प्रयत्न करत आहेत आणि कोर्ट त्यांना दिलासा देखील देतंय हाच मोठा घोटाळा आहे. आमचे लोक कोर्टात गेले की दिलासा मिळत नाही. पण हे लोक (भाजपा नेते) कोर्टात गेले की लगेच दिलासा मिळतो. तुमच्याच लोकांना दिलासा का? हा एक मोठा दिलासा घोटाळा आहे", असं संजय राऊत म्हणाले. 

नागपूर सध्या रिकामी दिसतंय "नागपूरचे सगळे नेते मुंबईत जाऊन बसलेत. नागपूर सध्या रिकामी दिसतंय म्हणून मी इथं आलोय", असंही संजय राऊत यावेळी म्हणाले. "विदर्भ आणि मराठवाड्यात पक्ष संघटनेकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्यामुळे त्यांच्या आदेशानुसार मी इथं पक्षाच्या कामासाठी आलो आहे. मी इथं कुणाला शह वगैरे देण्यासाठी आलेलो नाही", असं संजय राऊत म्हणाले. याआधी आम्ही युतीत लढत होतो त्यामुळे इथं भाजपाचा बालेकिल्ला आहे. याच कारणामुळे ज्या प्रमाणात इथं आमचा पक्ष वाढायला हवा होता तसा वाढला नाही. पण आता त्याकडे आम्ही लक्ष देत आहोत, असंही संजय राऊत म्हणाले.      

मोदी हिमालयात अन् सोमय्यांकडे सूत्रसंजय राऊत यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावरही यावेळी निशाणा साधला. किरीट सोमय्यांनी आता मातोश्रीवरही धडक देणार असल्याच म्हटलं आहे. याबाबत राऊत यांना विचारण्यात आलं असता आम्ही वाट बघतोय, कोण येतंय ते आम्हाला पाहायचं आहे असं म्हटलं. "केंद्रीय तपास यंत्रणांची ईडी, सीबीआय यांची सुत्रं मोदींनी किरीट सोमय्या यांच्याकडे दिली आहेत आणि स्वत: हिमालयात जाऊन बसले आहेत", असा टोला संजय राऊत यांनी लगावला. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv Senaशिवसेनाnagpurनागपूर