शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, उगाच नाक खुपसू नये”; संजय राऊतांची टीका
4
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
5
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
6
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
7
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
8
Maharashtra Election 2024 Live Updates: निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्या बॅगची तपासणी
9
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
10
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
11
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
12
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
13
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
14
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
15
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
16
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
17
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
18
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
19
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
20
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा

देशात चार लाखांमधून फक्त सात हजार मनोरुग्णांवरच उपचार होतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2019 10:48 AM

एका सर्वेक्षणानुसार देशात चार लाखाहून अधिक मानसिक रुग्ण रस्त्यावर आहेत. आम्ही केवळ आतापर्यंत सात हजार रुग्ण बघितले. या कार्यात प्रत्येकाने सहभागी होण्याचे आवाहन‘रमन मॅगसेसे’ पुरस्कार विजेते प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. भरत वाटवानी यांनी येथे केले.

ठळक मुद्देभरत वाटवानी यांची माहिती ‘अकॅडमीऑफ मेडिकल सायन्सेस’ची वार्षिक परिषद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एका सर्वेक्षणानुसार देशात चार लाखाहून अधिक मानसिक रुग्ण रस्त्यावर आहेत. आम्ही केवळ आतापर्यंत सात हजार रुग्ण बघितले. भारतीय क्रिकेट संघाला ३०० वर धावा काढण्याचे लक्ष्य असताना सचिन तीन-चार धावांवर बाद होण्यासारखी ही स्थिती आहे. त्यामुळे आम्ही पुरस्कृत करण्यासारखे काही केले नसल्याची भावना व्यक्त करीत, या कार्यात प्रत्येकाने सहभागी होण्याचे आवाहन रस्त्यावरील निराधार मनोरुग्णांच्या उपचारासाठी कार्य करणारे ‘रमन मॅगसेसे’ पुरस्कार विजेते प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. भरत वाटवानी यांनी येथे केले.‘अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सेस’(एएमएस)च्या वतीने रविवारी वार्षिक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर ‘एएमएस’चे अध्यक्ष डॉ. हरीश वरभे, सचिव डॉ. अजय अंबाडे, परिषदेचे अध्यक्ष डॉ. राजू खंडेलवाल, यंग अचिव्हर्स अवॉर्डचे अध्यक्ष डॉ. रमेश मुंडले डॉ. नरेंद्र मोहता व डॉ. एस. एन. देशमुख उपस्थित होते.डॉ. वाटवानी म्हणाले की, १९९८ साली कैलास मानसरोवर यात्रेची संधी मिळाली. मात्र, त्यावेळी दोन मनोरुग्ण भरती झाल्याने यात्रेला जाण्याचे टळ्ले. त्या प्रवासातील सर्व भाविकांचा अपघाती मृत्यू झाला. मी गेलो असतो तर कदाचित मलाही मृत्यू ओढावला असता.या घटनेने जीवनाकडे बघण्याच्या दृष्टिकोन बदलला. त्यानंतरच्या काळात प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ता बाबा आमटे यांच्याशी भेट झाली. त्यांच्यातील नि:स्वार्थ भाव बघून रस्त्यावरील मनोरुग्णांसाठी श्रद्धा रिहॅबिलिटेशन केंद्र सुरू करण्याची प्रेरणा मिळाली.

राजेश खन्नांचे फोटो विकून उदरनिर्वाहडॉ. वाटवानी म्हणाले, एकदा एक रुग्ण नारळाच्या रिकाम्या कवटीमध्ये गटारातील पाणी पिताना दिसला आणि तेथूनच रस्त्यावरील मनोरुग्णांसाठी काहीतरी करण्याची प्रेरणा निर्माण झाली. आम्ही लहान असताना वडील वारल्याने राजेश खन्नांचे फोटो, पुस्तके विकून उदरनिर्वाह करावा लागला. त्या वेदना उराशी असल्याने लोकांबद्दलच्या संवेदना आणखी तीव्र झाल्याचेही ते म्हणाले.

‘एएमएस’तर्फे नवा अभ्यासक्रम - डॉ. वरभेप्रास्ताविक डॉ. वरभे यांनी केले. त्यांनी ‘एएमएस’तर्फे नवे अभ्यासक्रम सुरू करण्याचा मानस बोेलून दाखविला. युवा डॉक्टरांना संस्थेशी जुळण्याचे आवाहन केले. डॉ. राजू खंडेलवाल यांनी या वार्षिक परिषदेची विस्तृत माहिती दिली. डॉ. अशोक अरबट आणि डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांच्या कार्यात सुरू झालेल्या या परिषदेला पुढे नेताना आनंद असल्याची भावना व्यक्त केली. यावेळी ‘मेंबर डिरेक्टरी’चे विमोचन करण्यात आले.

कृष्णा कांबळे यांना ‘प्रोफेशनल एक्सलन्स पुरस्कार’मेडिकलच्या कर्करोग विभागाचे प्रा. डॉ. कृष्णा कांबळे यांना प्रोफेशनल एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार कर्करोगाच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल देण्यात आला. कर्करोग तज्ज्ञ डॉ. अमोल डोंगरे यांना ‘यंग अचिव्हर्स’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संचालन डॉ. कल्पना दाते व डॉ. वर्तिका पाटील यांनी केले, तर आभार डॉ. अजय आंबाडे यांनी मानले.

टॅग्स :Healthआरोग्य