रामटेक : राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल अलीकडेच जाहीर झाला. तीत रामटेक तालुक्यातील दोन शाळांचे दोनच विद्यार्थी नापास झाले. बाकी सर्व शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. रामटेक तालुक्यात २४२६ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. सर्वच विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी २४२४ विद्यार्थी उतीर्ण झाले. तालुक्याची उत्तीर्णतेची टक्केवारी ९९.९१ टक्के आहे. यात ७९३ विद्यार्थ्यांनी प्रावीण्य श्रेणी प्राप्त केली आहे. १३५२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, तर २७९ विद्यार्थी हे द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. तृतीय श्रेणीत एकही विद्यार्थी नाही. राष्ट्रीय आदर्श विद्यालय रामटेक व स्वामी विवेकानंद विद्यालय, देवलापार येथील प्रत्येकी एक विद्यार्थी अनुत्तीर्ण (नापास) झाला.
या शाळांचा निकाल १०० टक्के
श्रीराम विद्यालय, समर्थ हायस्कूल, श्रीराम कन्या विद्यालय, रामजी महाजन न.प. विद्यालय, रामटेक, प्रकाश हायस्कूल, कांद्री, नंदिवर्धन हायस्कूल, नगरधन, जि. प. हायस्कूल, बोथियापालोरा, जि. प. हायस्कूल, वडंबा, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, बेलदा, इंदिरा गांधी विद्यालय, बोरी, संत ज्ञानेश्वर विद्यालय, महादुला, महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय, भंडारबोडी, शांतिनिकेतन विद्यालय, हिवराबाजार, राष्ट्रीय आदर्श विद्यालय, मनसर, ज्ञानदीप विद्यामंदिर, करवाई , पुण्यश्लोक विद्यानिकेतन, खुमारी, चक्रधर स्वामी विद्यालय, मनसर, जयसेवा आदर्श विद्यालय, पवनी, जयसेवा आदिवासी आश्रमशाळा, दाहोदा, स्व. इंदिरा गांधी विद्यालय, नगरधन, नवजीवन हायस्कूल, पथरई, महात्मा फुले विद्यालय, खैरी बिजेवाडा, उदय विद्यालय, देवलापार, स्वामी शिताराम महाराज विद्यालय, शिवनी, स्व. नंदकिशोर जैस्वाल विद्यालय, काचुरवाही, गुरुदेव टागौर वनपर्यावरण विद्यालय, मांद्री, मातोश्री काशीदेवी माध्यमिक विद्यालय, मुसेवाडी, ज्ञानदीप काॅन्व्हेट रामटेक, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा नवेगाव, राणी दुर्गावती आदिवासी आश्रमशाळा, टांगला, गुरुकुल माध्यमिक आश्रमशाळा, देवलापार, प्रोव्हिडन्स हायस्कूल, मनसर व समर्थ कॉन्व्हेट शाळा, रामटेक यांचा समावेश आहे.