लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शिक्षण चांगल्या पद्धतीने सुरू आहे, हे दर्शविण्यासाठी प्रत्येक शिक्षकांनी आपल्या अध्ययन अध्यापन कार्याचा साप्ताहिक अहवाल ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. असे निर्देश राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे कडून देण्यात आले आहे. ऑनलाईन अहवाल भरण्यासाठी जी वेबसाईट दिली आहे, तीच सुरक्षित नसल्याची ओरड शिक्षकांची आहे. त्यामुळे शिक्षकांनी भरलेला माहिती हॅक होण्याची भीती शिक्षकांनी व्यक्त केली आहे.सध्यस्थितीत राज्यात शाळा बंद असल्या तरी विविध ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून, ज्या विद्यार्थ्यांकडे डिजिटल साधने उपलब्ध नाहीत अशा विद्यार्थ्यांच्या गृहभेटी घेऊन व शिक्षक मित्र उपक्रमाच्या माध्यमातून शिक्षण देणे सुरू ठेवले आहे. शिक्षक करीत असलेल्या या प्रयत्नांची, उपक्रमांची माहिती राज्य शासनास, केंद्र शासनास व इतर राज्यांना व्हावी याकरिता शिक्षण परिषदेने दिलेल्या या http://covid19.scertmaha.ac.in/Teacher.aspxलिंकवर शिक्षकांना माहिती भरायची आहे. ही माहिती शिक्षकनिहाय, शाळानिहाय, केंद्रनिहाय, तालुकानिहाय व जिल्हानिहाय आठवड्यातून एकदा भरायची असून त्याकरिता प्रत्येक शिक्षकांनी पोर्टलवर आपली नोंदणी करायची आहे. नोंदणीसाठी शिक्षकांना आपली वैयक्तिक माहिती भरायची आहे.पण ही वेबसाईटच असुरक्षित असल्याचा शिक्षकांचा दावा आहे. यासंदर्भात प्रजासत्ताक शिक्षक कर्मचारी संघाचे कार्याध्यक्ष हेमंत गांजरे यांनी सांगितले की, जेव्हा एखाद्या वेबसाईटच्या नावाच्या अगोदर कुलुपाचे चिन्ह असते, तेव्हा ती वेबसाईट सुरक्षित समजल्या जाते. ही वेबसाईट उघडल्यावर स्वत: ती सुरक्षित नसल्याचे म्हणजे ‘नॉट सिक्युअर्ड’ असल्याचे दाखवित आहे.या वेबसाईटवर वैयक्तिक माहिती तसेच विषयाची माहिती भरावयाची आहे. शिक्षण विभागाची ही वेबसाईट कधीही हॅक होऊ शकते. यापूर्वी अशा अनेक वेबसाईट हॅक केलेल्या आहेत. त्यामुळे शिक्षकांनी सावधान होऊन, डोळे बंद करून आपली माहिती भरू नये.हेमंत गांजरे, कार्याध्यक्ष, प्रजासत्ताक शिक्षक कर्मचारी संघ
अध्ययन, अध्यापन अहवालाची माहिती भरणारी वेबसाईटच असुरक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 1:13 AM
शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शिक्षण चांगल्या पद्धतीने सुरू आहे, हे दर्शविण्यासाठी प्रत्येक शिक्षकांनी आपल्या अध्ययन अध्यापन कार्याचा साप्ताहिक अहवाल ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. असे निर्देश राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे कडून देण्यात आले आहे. ऑनलाईन अहवाल भरण्यासाठी जी वेबसाईट दिली आहे, तीच सुरक्षित नसल्याची ओरड शिक्षकांची आहे.
ठळक मुद्देमाहिती हॅक होण्याची भीती : डोळे मिटून माहिती भरू नका, शिक्षकांना आवाहन