लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: दिल्लीत माहिती व प्रसारण मंत्रालयात काम करत असलेल्या गीता यादव उर्फ गीता यथार्थ यांनी टॉयलेटचा दरवाजा उघडा ठेवून काढलेला फोटो सोशल मिडियावर टाकला आणि पाहता पाहता त्यावर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रियांचे मोहोळ उठवले. तर काहींनी त्यांच्या या कृतीमागची भूमिका जाणून त्याबद्दल संवेदनशीलतेने प्रतिक्रिया दिल्या होत्या.
एका खाजगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गीता यांनी त्या फोटोमागचे वास्तव मनमोकळेपणाने नेटकऱ्यांसमोर आणले आहे. त्या म्हणतात,हा फोटो टाकण्यामागे माझे फार काही नियोजन नव्हते. एका क्षणी तो विचार मनात आला आणि मी ते केलं. आता याचं कारण विचाराल तर,मी आणि माझा साडेचार वर्षांचा लहान मुलगा राहतो. मी सिंगल मदर आहे. माझ्या मुलाचे नाव यथार्थ आहे. त्याने मी टॉयलेटमध्ये असताना दरवाजा बाहेरून बंद करू नये, त्याला काही झालं, तो पडला तर मला माहीत व्हावं अशा सुरक्षिततेच्या जाणीवेतून मी बेडरूम वा टॉयलेटचा दरवाजा बंद करत नाही. मात्र त्या दिवशी त्याने माझा फोटो काढला तेव्हा, माझ्या मनात विचार आला की, हे सगळ््याच आयांसोबत होत असावं का.. त्यांनाही एका मिनिटासाठीही प्रायव्हसी जगता येत नसावी का.. अशा प्रश्नांनी मला घेरले व ते जाणून घ्यावंसं वाटलं. म्हणून मी तो फोटो टाकला. यावर काही नेटकºयांनी म्हटलं आहे की, केवळ शब्दांनी मांडता आलं नसतं का.. यावर माझं म्हणणं असं आहे की, एक फोटो हजार शब्दांचे काम करतो.. आणि आपण हे आता पाहतच आहोत..
गीता पुढे म्हणतात, एखाद्या स्त्रीला ती आई आहे असं म्हणणं हे फार उदात्त वाटतं. पण तिला ती भूमिका निभावताना कशाला तोंड द्यावे लागते हे पहाणे गरजेचे असते. तिच्या आईच्या भूमिकेला ग्लोरिफाय करणं योग्य नाही असं मला वाटतं.माझ्या या फोटोवर खूप वादळ उठलं. अनेकांनी अत्यंत हीन भाषेत कॉमेंटस लिहिल्या. पण हा फोटो अश्लील नाही. त्यात नग्नता नाही. शहरात कित्येक मुली शॉर्टस् घालून बाहेर फिरतात. तेव्हा कुणीच आक्षेप घेत नाही.नेटकºयांचा एक विशिष्ट वर्ग आहे, ते एखाद्या शालीन फोटोवरही अश्लील कॉमेंट करतात. एक वर्ग असाही आहे तो सेक्स, रेप याचाच शोध घेत राहतो.स्पष्ट व ठाम बोलणारी स्त्री वा मुलगी पसंत केली जात नाही. पारंपारिक समाजव्यवस्थेत त्या व्यवस्थेला पचेल असेच बोलणारी स्त्री मान्य केली जाते.महिलांकडून आलेल्या कॉमेंटसमध्येही, मी हे पब्लिसिटीसाठी केल्याचे म्हटले आहे. एका पुरुषाने विचारले हा फोटो आहे की सेल्फी आहे..मला असं वाटतं की, मी मदरहूडबाबत बोलतेय, सिंगल मदरबद्दल बोलतेय.. तिच्या कुचंबणेबाबत तिच्या आव्हानांबाबत बोलतेय आणि लोक विचारत आहेत की तुम्ही हा सेल्फी घेतलाय का.. ?काय होती घटना?टॉयलेटचा दरवाजा उघडून कमोडवर बसलेल्या अवस्थेतला फोटो गीता यथार्थ यांनी आपल्या फेसबुकपेजवर अपलोड केला होता. हा फोटो त्यांच्या लहान मुलाने काढला होता. एका सिंगल मदरसमोरची आव्हाने, तिची कुचंबणा, तिची अगतिकता व्यक्त करण्यासाठी त्यांनी ही पोस्ट केली होती. त्यावर नेटकºयांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले होते.
https://www.lokmat.com/nagpur/currently-discussion-single-parent-sitting-toilet-door-open-a313/
https://m.facebook.com/story.php?story_fbid=4152711514762299&id=100000704730259े