लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘कॉन्ट्रासेप्टिव्हज ओरल’ म्हणजे गर्भधारणा राहू नये म्हणून तोंडातून घेण्यात येणाऱ्या औषधांची शहरात सर्रास विक्री होत आहे. विशेष म्हणजे, कुमारवयीन मुलींमध्ये या गोळ्यांचा वापर वाढला आहे. शहरातील विविध औषधांच्या दुकानातून रोज सुमारे दोन हजारावर गोळ्यांची विक्री होत असल्याचे खुद्द दुकानदारांचे म्हणणे आहे.लग्नापूर्वीच्या प्रेमसंबंधामध्ये असुरक्षित यौनसंबंधाचे प्रमाण वाढले आहे. तर दुसरीकडे शहरातील अल्पवयीन मुले ‘सेक्स’ करण्यात सक्रिय असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. या सर्वेक्षणात देशातील महानगरांसह २० प्रमुख शहरांमधील १३ ते १९ वर्षे वयोगटातल्या १५ हजार मुलांकडून माहिती घेतली असता वयाच्या १४ वर्षाच्या आत असलेली मुले व वयाच्या १४ वर्षानंतर असलेल्या मुली पहिल्यांदा सेक्स करीत असल्याची बाब उघडकीस आली आहे. सध्याच्या जीवनशैलीत सर्वांचा खासगी जीवनातील रस वाढला आहे आणि त्यातूनच असे प्रकार घडत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यातूनच अतिकाळजीपोटी तातडीच्या गर्भनिरोधक गोळ्या घेण्याचे प्रमाणही वाढले आहे. ‘अनवॉन्टेड ७२’ व ‘आयपील’ या गोळ्यांच्या मागणीत वाढ झाली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय या गोळ्या घेऊ शकत असल्याचा दावा काही जाहिरातींमधून केला जात असल्याने, औषध विक्रीच्या दुकानांवर त्या सहज उपलब्ध आहेत.प्रिस्क्रिप्शनशिवाय गोळ्यांची विक्रीअसुरक्षित यौनसंबंधावर उपाय म्हणून ‘इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह’ गोळ्यांची निर्मिती झाली. पूर्वी ‘माला-डी’च्या नावाने शासकीय रुग्णालयांमध्ये या गोळ्या मोफत मिळायच्या. मात्र, मागणी अभावामुळे ही योजना बारगळली. परंतु काही कंपन्यांनी याचे पद्धतशीर मार्केटिंग केल्याने आता याच गोळ्या भरमसाट किमतीत विकल्या जात आहेत. परिणामी, डॉक्टरांना न विचारता या गोळ्यांचा वापर वाढला आहे.विक्रीतून मोठा नफाएका औषध विक्रेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले, ‘अनवॉन्टेड ७२’ व ‘आयपील’ या गर्भनिरोधक गोळ्या ‘शेड्यूल के’मध्ये मोडतात. यामुळे विनाप्रिस्क्रिप्शन या गोळ्या विकता येतात. शिवाय, या गोळ्यांच्या विक्रीतून मोठा नफा मिळतो. सध्या रोज आठ ते दहा पिल्स पाकिटांची विक्री होते. दिवसेंदिवस विक्री वाढतच चालली आहे. याचे गिऱ्हाईक साधारणत: १६ ते ३० वर्षे वयोगटातील आहेत. यात कुमारवयीन मुला-मुलींची संख्या मोठी आहे, असेही त्यांनी सांगितले.डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊच नयेअतिकाळजीपोटी या गोळ्यांचा वापर वाढतच चालला आहे. ‘इमर्जन्सी’ गर्भनिरोधक गोळ्या या केवळ आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यासाठी आहेत. सततच्या गोळ्यांनी गर्भधारणेवर परिणाम होऊ शकतो. शारीरिक संबंधानंतर ७२ तासांत घ्यावयाच्या गोळ्यांनी १०० टक्के गर्भधारणा थांबतेच असे नाही. कोणत्याही औषधाचे अतिसेवन घातकच ठरते. सोबतच पाळी अनियमित होण्याचीही शक्यता अधिक असते. यामुळे पुढे जाऊन अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.डॉ. वैशाली खंडाईतप्रसूती व स्त्रीरोगतज्ज्ञगर्भनिरोधकावर नाही, गर्भपातावर बंधनगर्भनिरोधकासाठी वापरण्यात आलेले साहित्य व गोळ्यांच्या विक्रीवर बंधन नाही. कारण त्या ‘शेड्यूल के’मध्ये मोडतात. परंतु गर्भपाताच्या गोळ्यांचा ‘शेड्यूल एच’मध्ये समावेश होतो. अशा गोळ्या डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शनशिवाय विकणे गुन्हा ठरतो.पी.एम.बल्लाळसहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन