शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

नागपुरात इंडस्ट्रीयल बर्फाची बाजारात सर्रास विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 1:22 AM

आजाराला आमंत्रण देणाऱ्या इंडस्ट्रीयल म्हणजे अखाद्य बर्फाची बाजारात सर्रास विक्री सुरू आहे. उन्हाळ्यात लग्नसमारंभात पिण्याच्या पाण्यात हा बर्फ टाकण्यात येत आहे. या अवैध प्रकाराकडे अन्न व औषध प्रशासन विभागाचे दुर्लक्ष असून कारखाने वा विक्रेत्यांवर अजूनही कारवाई केलेली नाही.

ठळक मुद्देआजाराची भीती : अन्न प्रशासन विभागाचा कानाडोळा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आजाराला आमंत्रण देणाऱ्या इंडस्ट्रीयल म्हणजे अखाद्य बर्फाची बाजारात सर्रास विक्री सुरू आहे. उन्हाळ्यात लग्नसमारंभात पिण्याच्या पाण्यात हा बर्फ टाकण्यात येत आहे. या अवैध प्रकाराकडे अन्न व औषध प्रशासन विभागाचे दुर्लक्ष असून कारखाने वा विक्रेत्यांवर अजूनही कारवाई केलेली नाही.उन्हाळ्यात चौपाटीवरील खाद्यान्नाच्या हातठेल्यावर अखाद्य बर्फाचा सर्रास उपयोग करण्यात येत आहे. आईसगोळा याच बर्फापासून तयार करून त्यावर रासायनिक रंग टाकण्यात येतो. चवीने खाणाऱ्या लहान मुलांसह वयस्कांना या बर्फाने आजार केव्हा होतो, हे कळत नाही. अखाद्य बर्फ लगेच ओळखता यावा म्हणून त्याला निळसर रंग देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्या संदर्भात अध्यादेशही काढले आहेत. त्याची अंमलबजावणी १ जूनपासून होणार आहे. पण ट्रायल म्हणून नागपुरातील कोणत्याही बर्फ कारखान्यांनी इंडस्ट्रीयल बर्फाला निळसर रंगात देऊन विक्रीस आणले नाहीत. बाजारात अजूनही अखाद्य बर्फाचा थेट खाद्य बर्फ म्हणून उपयोग होत आहे.उन्हाळ्यात बर्फाची सर्वाधिक विक्री होते. मूळात क्यूब आकारात येणारा पारदर्शक बर्फ खाद्य म्हणून उपयोग येतो. अशा प्रकारचा बर्फ तयार करणारे कारखाने नागपुरात कमी आहेत. पण इंडस्ट्रीयल म्हणजेच अखाद्य बर्फ मोठ्या लाद्यांमध्ये बाजारात विक्रीस येतो. नियमानुसार या बर्फाची विक्री अवैध आहे. पण बाजारात मोठ्या लादीचे तुकडे करून ग्राहकांना विकण्यात येत आहे. या बर्फामुळे गंभीर आजारही होऊ शकतात. अखाद्य बर्फ अशुद्ध पाण्यापासून तयार करण्यात येतो. त्यामुळे तो खाण्यायोग्य नाही. असे असतानाही विभागाकडून कारवाई शून्य आहे. या संदर्भात अनेक तक्रारी विभागाकडे प्राप्त झालेल्या आहेत. या अखाद्य बर्फाचा उपयोग मृतदेह शीत ठेवणे, वस्तूंची साठवणूक आणि वाहतुकीसाठी वापरलेल्या बर्फाचा खाद्यपदार्थांसाठी संपर्क येऊ नये, असे शासनाचे आदेश आहे. त्यानंतरही या बर्फाचा बाजारात विक्री होत आहे. हे एक गूढच आहे.अध्यादेशाची १ जूनपासून अंमलबजावणी होणार असल्यामुळे खाद्य बर्फ तयार करण्यासाठी आता अन्न व औषध प्रशासन विभागाचा तसा परवाना आणि निकषाचे पालन करावे लागणार आहे.बर्फ कारखान्यांची तपासणीअखाद्य बर्फ विक्रीच्या संदर्भात उन्हाळ्यात बर्फ कारखान्यांची तपासणी केली आहे. शासनाच्या अध्यादेशाची अंमलबजावणी १ जूनपासून होणार आहे. कारखान्यांना उपकरणांच्या बदलांसाठी बराच अवधी मिळाला आहे. शासनाच्या आदेशाचे कारखान्यांनी पालन करावे. निळसर रंगाच्या बर्फसंदर्भात १ जूनपासून तपासणी व कारवाई करणार आहे.मिलिंद देशपांडे, सहायक आयुक्त,अन्न व औषध प्रशासन विभाग.

 

टॅग्स :Healthआरोग्यnagpurनागपूर