सूरजागड खाण विस्ताराला विरोध, प्रामाणिकता सिद्ध करावी लागणार; हायकोर्टाचा याचिकाकर्त्याला आदेश

By राकेश पांडुरंग घानोडे | Published: March 16, 2023 05:22 PM2023-03-16T17:22:13+5:302023-03-16T17:24:36+5:30

२००७ मध्ये लॉयड्स मेटल ॲण्ड एनर्जी कंपनीला या खाणीकरिता सूरजागडमधील ३४८.०९ हेक्टर जमीन ५० वर्षांच्या लीजवर देण्यात आली आहे

Oppose to Surjagad mine expansion; HC orders petitioner to prove honesty | सूरजागड खाण विस्ताराला विरोध, प्रामाणिकता सिद्ध करावी लागणार; हायकोर्टाचा याचिकाकर्त्याला आदेश

सूरजागड खाण विस्ताराला विरोध, प्रामाणिकता सिद्ध करावी लागणार; हायकोर्टाचा याचिकाकर्त्याला आदेश

googlenewsNext

नागपूर : गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुका स्थित सूरजागड लोह खनिज खाण विस्ताराविरुद्ध जनहित याचिका दाखल करणारे रायपूर येथील पर्यावरण संवर्धन कार्यकर्ते समरजित चॅटर्जी यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी स्वत:ची प्रामाणिकता सिद्ध करण्याचा आदेश दिला.

याचिकेवर न्यायमूर्तिद्वय अतुल चांदूरकर व महेंद्र चांदवाणी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, न्यायालयाला चॅटर्जी यांच्या प्रामाणिकतेवर संशय आला. त्यामुळे न्यायालयाने प्रतिवादींना नोटीस जारी करणे टाळून चॅटर्जी यांना आधी स्वत:ची प्रामाणिकता सिद्ध करण्यास सांगितले. २००७ मध्ये लॉयड्स मेटल ॲण्ड एनर्जी कंपनीला या खाणीकरिता सूरजागडमधील ३४८.०९ हेक्टर जमीन ५० वर्षांच्या लीजवर देण्यात आली आहे. ही जमीन दक्षिण एटापल्ली वन क्षेत्रांतर्गत येते. सध्या या खाणीमधून वर्षाला ३० लाख टन लोह खनिज काढण्याची परवानगी आहे. कंपनी ही क्षमता वाढवून एक कोटी टन करणार आहे.

नियमानुसार, खणीकर्माची क्षमता मुळ क्षमतेपेक्षा ५० टक्क्यापेक्षा जास्त वाढविता येत नाही. परंतु, या खाणीच्या बाबतीत या नियमाची पायमल्ली केली जात आहे. कंपनीची मागणी पूर्ण झाल्यास या खाणीतून रोज ८०० ते १००० ट्रक लोह खनिज काढले जाईल. त्यासाठी स्फोटके वापरले जातील. त्यामुळे ध्वनी व वायू प्रदूषण वाढेल. नदीचे पाणी प्रदूषित होईल. मानव व प्राण्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतील, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.

Web Title: Oppose to Surjagad mine expansion; HC orders petitioner to prove honesty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.