लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वरोरा, जि. चंद्रपूर येथील आनंद निकेतन कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल करून परीक्षेमुळे लोकसभा निवडणुकीचे कामे करण्यास विरोध दर्शविला आहे.याचिकाकर्त्यांमध्ये अरविंद सवाने व इतर १४ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.या प्रकरणावर बुधवारी न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व श्रीराम मोडक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने प्राथमिक मुद्दे लक्षात घेता महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग, चंद्रपूर जिल्हाधिकारी, गोंडवाना विद्यापीठ व महाविद्यालयाला नोटीस बजावून यावर ३ एप्रिलपर्यंत उत्तर सादर करण्यास सांगितले. तसेच, याचिकाकर्त्यांच्या जागांवर पर्यायी व्यवस्था करण्यावर पुढील तारखेपर्यंत निर्णय घेण्याचे निर्देश दिले.१२ मार्च रोजी चंद्रपूर जिल्हाधिकाºयांनी याचिकाकर्त्यांना वैयक्तिक आदेश जारी करून त्यांची निवडणूक कामांसाठी नियुक्ती करण्यात आल्याचे व त्याकरिता प्रशिक्षण पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यावर याचिकाकर्त्यांचा आक्षेप आहे. उन्हाळी परीक्षा सुरू झाल्यामुळे निवडणुकीची कामे करणे अशक्य आहे. तसेच, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. प्रदीप वाठोरे यांनी कामकाज पाहिले.
महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांचा निवडणुकीची कामे करण्यास विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 11:55 AM
वरोरा, जि. चंद्रपूर येथील आनंद निकेतन कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल करून परीक्षेमुळे लोकसभा निवडणुकीचे कामे करण्यास विरोध दर्शविला आहे.
ठळक मुद्देहायकोर्टात याचिका निवडणूक आयोगाला नोटीस