लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तुकडोजी पुतळा चौकाजवळ मागील अनेक वर्षांपासून म्हाडाच्या क्वॉर्टरपुढे रहिवाशांनी टिनाचे शेड उभारलेले आहेत. सोमवारी महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने शेडचे अतिक्रमण हटविले. या कारवाईला स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शविला. महापालिकेने अतिक्रमण हटविण्यासंदर्भात कोणत्याही प्रकारची नोटीस न देता कारवाई करीत असल्याचा नागरिकांचा आरोप होता. यामुळे काही वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. अधिकाऱ्यांनी रहिवाशांना अतिक्रमण हटविण्यासाठी काही दिवसाची मुदत दिल्यानंतर पथक माघारी फिरले.त्यानंतर पथक छोटा ताजबाग, क्रीडा चौक व मेडिकल चौकात पोहचले. फूटपाथवरील १२ शेड हटविले. दुसºया पथकाने धंतोली झोन क्षेत्रातील कुंभारटोली येथील एका धार्मिक स्थळाचे अतिक्रमण तोडले. काही दिवसापूर्वी येथील अतिक्रमण हटविण्याला स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शविला होता. यावरून वाद निर्माण झाला होता. याचा विचार करता प्रचंड पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली.त्यानंतर पथकाने हनुमान गल्ली येथील येथील एक व रामदासपेठ येथील पवनसूत अपार्टमेंटजवळील दोन अनधिकृत धार्मिक स्थळे हटविली. ही कावरार्ई प्रवर्तन विभागाचे सहायक आयुक्त अशोक पाटील, प्रवर्तन निरीक्षक संजय कांबळे, जमशेद अली, संजय शिंगणे, नितीन मंथनवार, शरद इरपाते व पथकाने केली.फूटपाथ मोकळे करण्याची कारवाई संथमहापालिकेच्या अतिक्रमण विभागाला आयुक्तांनी शहरातील फूटपाथ मोकळे करण्याचे आदेश दिलेले आहेत. परंतु प्रवर्तन विभागाचे पथक काही झोनमध्ये धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्यात तर कुठे अतिरिक्त बांधकाम हटविण्याची कारवाई केली जात आहे. यामुळे फूटपाथवरील अतिक्रमण हटविण्यासाठी पथक उपलब्ध होत नाही. त्यामुळे इतर अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईमुळेफूूटपाथवरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई संथ पडली आहे.