नागपूर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे, या निर्णयाला रिपब्लिकन सेनेने विरोध केला असून, हा निर्णय रद्द करून एक सदस्यीय पद्धतीचा अवलंब करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. यासंदर्भात विभागीय आयुक्तांमार्फत मुख्यमंत्री आणि निवडणूक आयुक्तांना निवेदनही सादर केले आहे. बहुसदस्यीय पद्धत ही छोट्या राजकीय पक्षांचे अस्तित्व संपविण्यासाठी असल्याचा आरोप निवेदनात केला आहे.
प्रदेश अध्यक्ष सागर डबरासे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळात प्रा. भूषण भस्मे, धर्मपाल वंजारी, राजकुमार तांडेकर, संजय सुखदेवे, नरेंद्र तिरपुडे, शरद दंढाळे, नीतेश रंगारी, सुरेश मानवटकर, संजय सुखदेवे, शरद दंढाळे, नीलेश खडसन, अरविंद कारेमोरे, नीलेश सरसान, राजू मेश्राम, सुरेश खोब्रागडे, राहुल सूर्यवंशी, अभय हिरणवार, रूपेश कुथे, चंद्रकला मानवटकर, मोरेश्वर बागडे आदींचा समावेश होता.