लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पावसाळा लागायला १५ दिवसाचा कालावधी शिल्लक आहे. त्यात पाणी टंचाईच्या कामाचा पत्ता नाही, करारनामे अपूर्ण आहे, यावर पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता चुकीची उत्तरे देऊन दिशाभूल करीत आहे. त्यांच्या ढिसाळ धोरणामुळेच ग्रामीण भाग पाण्यासाठी तहानलेला असल्याचा आरोप जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष नेते अनिल निधान यांनी केला.बुधवारी पार पडलेल्या स्थायी समितीची बैठकीत निधान यांनी पाणी पुरवठा विभागाची चांगलीच खरडपट्टी काढली. तीन दिवसात कामाला सुरुवात न झाल्यास विरोधी बाकावरील सर्व सदस्य जिल्हाधिकाऱ्यांना भेटून अभियंत्याना हटविण्यासंदर्भांत निवेदन देतील. जिल्ह्यात दरवर्षी भेडसावणारी पाण्याची टंचाई लक्षात घेता, विभागाने पूर्वीच याचे नियोजन करायला हवे होते. यावर अभियंता टाकळीकर यांना विचारणा केली असता टोलवाटोलवीचे उत्तर देतात. १५ दिवसात कामे न झाल्यास टंचाईचे नियोजन पूर्णत: फिस्कटेल, याला सर्वस्वी सत्ता पक्ष जबाबदार राहील, असेही निधान म्हणाले. सभेदरम्यान, तीर्थक्षेत्र कामामध्ये गैरव्यवहाराचा आरोप सदस्य नाना कंभाले यांनी लावला. तीर्थक्षेत्राची कामे भाजपाच्या काळात अंदाजपत्रक आणि नियमात राहूनच झाली आहे. त्यात कुठल्याही प्रकारची अनियमितता नाही, असा पलटवार करून सभागृहात कंभाले यांचा आरोप सुद्धा निधान यांनी खोडून लावला. मात्र, या कामांवर चौकशी समिती नेमून अहवाल सादर करण्याची भूमिका अध्यक्ष रश्मी बर्वे यांनी घेतली.कोरोनाकाळात जिल्ह्यातील काही कंपन्या सुरू झाल्यात. असंख्य कामगार कामावर रुजू होत आहे, मात्र, यामध्ये किती कामगार शिफ्टनिहाय असावे, सोशल डिस्टन्सिंग, कामगारांच्या जेवण, निवासाची व्यवस्थेची सीईओनी पाहणी करावी, जेणेकरून कोरोनाचा उद्रेक अशा प्रकारातून होणार नाही. विकासकामांना अद्यापही मंजुºया नाही, त्यासाठी सर्वसाधारण सभा लवकर घेणे गरजेचे आहे, अशीही सूचना निधान यांनी केली.
नागपूर जिल्हा परिषदेतील विरोधक कार्यकारी अभियंत्यावर संतप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 12:53 AM
पावसाळा लागायला १५ दिवसाचा कालावधी शिल्लक आहे. त्यात पाणी टंचाईच्या कामाचा पत्ता नाही, करारनामे अपूर्ण आहे, यावर पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता चुकीची उत्तरे देऊन दिशाभूल करीत आहे. त्यांच्या ढिसाळ धोरणामुळेच ग्रामीण भाग पाण्यासाठी तहानलेला असल्याचा आरोप जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष नेते अनिल निधान यांनी केला.
ठळक मुद्दे१५ दिवस शिल्लक असताना टंचाईच्या कामाला सुरुवात नाही