नागपूर : काँग्रेस पक्षाकडून शहरातील अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करण्यात आले.
अनेक ठिकाणी सायकल मार्च निघाला तर काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी ‘कर्ज द्या’ आंदोलन केले. हात उंचावून केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अन्य विरोधी पक्षांनीही या मुद्यायारून आंदोलन केले.
...
काँग्रेसच्या ब्लॉक क्रमांक-१ कडून सायकल मार्च ()
पेट्रोलसह डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरमध्ये झालेल्या दरवाढीच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला. ब्लॉक अध्यक्ष ज्ञानेश्वर ठाकरे तसेच अल्पसंख्यक सेलचे शहराध्यक्ष इर्शाद अली यांच्या उपस्थितीत बरईपुरा चौकातून हा मोर्चा काढण्यात आला. यात मुकेश पौनीकर, चंदा राऊत, राजेश डेंगे, सुरेंद्र मेश्राम, दुर्गेश प्रधान, देशमुख गुरुजी, रणजित ठाकूर, राजेश खानोरकर, लक्ष्मणराव बाड़बुधे, रामचंद्र दंडारे, राजू वाघ, शेखर ठेंगे, बंटी पांडे, दीपक पांडे, सारांश कांबळे, राजेश ठेंगे, दिलावर आदी सहभागी झाले होते.
...
युवक काँग्रेसची सायकल रॅली (फोटो)
युवक काँग्रेसने देखील सायकल रॅली काढली. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे महागाई वाढत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
पालकमंत्री नितीन राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष कुणाल राऊत यांच्या नेतृत्वात बेझनबाग येथून रॅली काढून इंदोरा चौक मार्गे जरीपटका येथे आली. युवक काँग्रेसचे प्रदेश प्रभारी विजय सिंह राजू, महासचिव श्रीनिवास नालमवार, रत्नाकर जयपूरकर, सुरेश पाटील, कुमार रामटेके प्रामुख्याने उपस्थित होते. आशिष मडपे, आमिर नुरी, नीलेश खोब्रागडे, इर्शाद शेख, सचिन वासनिक, चेतन तरारे, ज्योती खोब्रागडे, अलीम बफाती, इमरान खान, आकाश इंदूरकर, निशांत इंदूरकर, राकेश ईखार, सागर उके, बाबू खान, कुणाल निमगडे, अनिरुद्ध पांडे, संजय सहारे, अब्दुल रशीद आदींचा सहभाग होता.
...काँग्रेस ब्लॉक क्र. ४ ची सायकल रॅली (फोटो)
काँग्रेसच्या ब्लॉक क्रमांक-४ चे अध्यक्ष प्रवीण गवरे, वाॅर्ड अध्यक्ष राहुल अभंग आणि प्रभाग अध्यक्ष रोशन बुधबावरे यांच्या नेतृत्वात दिघोरी चौकातून नंदनवन पेट्रोल पंपापर्यंत सायकल रॅली काढण्यात आली. या आंदोलनात प्रभाग क्रमांक २८ चे अध्यक्ष रोशन बुधबावरे, विवेक सोरते, रामभाऊ सोनटक्के, विलास गावंडे, नितीन मोंढे, अलीभाई, लतीफभाई, प्रकाश ढगे, चंद्रनाथ भागवतकर, वसंता लोनदासे, मधु पडोळे, महेश वैरागडे, नितीन चौधरी, अनिल वराडे, प्रेमानंद खरड आदी सहभागी झाले होते.
...
एनएसयूआयचे कर्ज द्या आंदोलन (फोटो)
एनएसयूआयने इंदाेरा चौकात आंदोलन केले. एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष आशिष मंडपे म्हणाले, कोरोना संक्रमणामुळे कॉलेजची फी भरता आली नाही. यात पुन्हा केंद्र सरकारने इंधन दरवाढ करून महागाईच्या उंबरठ्यावर आणून सोडले आहे. आता सरकारनेच पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी कर्ज द्यावे. आंदोलनात राष्ट्रीय प्रतिनिधी आमिर नुरी, वैष्णवी भरद्वाज, प्रदेश महासचिव प्रतीक कोल्हे, निखिल वानखेडे, शादाब सोफी, अनिरुद्ध पांडे, चेतन मेश्राम, कुणाल चौधरी, प्रणय ठाकूर, शुभम वाघमारे, विद्यासागर त्रिपाठी, रौनक नंदगावे आदी सहभागी होते.