शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
2
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
4
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
5
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
6
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
7
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
8
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
9
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
10
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
11
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
12
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
13
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
14
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
15
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
17
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
18
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
19
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
20
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या

-तर मिळेल का ‘शांती’?

By admin | Published: March 28, 2016 3:04 AM

पोलीस ठाण्याचा प्रस्ताव पाठविल्यानंतर तब्बल आठ वर्षांनी प्रत्यक्षात आलेल्या शांतिनगर पोलीस ठाण्यापुढे अवैध

नागपूर : पोलीस ठाण्याचा प्रस्ताव पाठविल्यानंतर तब्बल आठ वर्षांनी प्रत्यक्षात आलेल्या शांतिनगर पोलीस ठाण्यापुढे अवैध धंदे आणि खतरनाक गुन्हेगारांचा सफाया करण्याचे आव्हान आहे.व्यापक क्षेत्रफळ, अवैध धंद्यांची बजबजपुरी आणि गुन्हेगारांचा बोलबाला असल्याने लकडगंज पोलीस ठाण्याचे विभाजन करून शांतिनगर पोलीस ठाणे कार्यान्वित करावे, असा प्रस्ताव १७ मार्च २००८ ला पोलीस आयुक्तालयामार्फत शासनाकडे पाठविण्यात आला होता. त्याला २०१० मध्ये शासनाची मंजुरी मिळाली. त्यानंतर पोलीस ठाण्याच्या इमारतीसाठी जागेची शोधाशोध सुरू झाली. त्यात सहा वर्षे गेली. वर्षभरापूर्वीपासून पोलीस ठाणे कार्यान्वित करण्याच्या कामाला खऱ्या अर्थाने गती मिळाली आणि रविवारी हे ठाणे कार्यान्वित झाले. नवनिर्मित शांतिनगर ठाण्याचे क्षेत्रफळ पूर्व-पश्चिम ५ कि.मी., उत्तर-दक्षिण ३ कि.मी. असे १५ चौरस किलोमीटरचे क्षेत्रफळ आहे. १८ शाळा, २ महाविद्यालये, विविध धार्मिक स्थळे असलेल्या शांतिनगरात सर्वधर्म समुदायातील लोकांचे वास्तव्य आहे. मात्र, अवैध धंदे करणारे आणि गुन्हेगार शांतिनगरात नेहमीच अशांतता पसरवितात. दोन वर्षांपूर्वी वसीम चिऱ्या आणि तिरुपती भोगे या खतरनाक गुन्हेगारांनी एकमेकांच्या टोळ्यांवर सिनेस्टाईल गोळीबार करून सर्वत्र खळबळ उडवून दिली होती. तेव्हापासून शांतिनगरातील गुन्हेगारी प्रकर्षाने चर्चेला आली होती.अशा आहेत सीमा ४पूर्व-मस्के लेआऊट, बाबा रामसुमेरनगर, कावरापेठ ते रेल्वे क्रॉसिंग पो.स्टेशन. कळमना सीमेपर्यंत.४पश्चिम-उत्तर दक्षिण मेहंदीबाग रेल्वे क्रॉसिंग ते मस्कासाथ पुलाचा पूर्वेकडील भाग ते पो.स्ट.े पाचपावली सीमेपर्यंत.४उत्तर-कावरापेठ ते मेहंदीबाग रेल्वे क्रॉसिंग दक्षिणेकडील भाग, शांतिनगर कॉलनी, प्रेमनगर, पो.स्टे. यशोधरानगर सीमेपर्यंत.४दक्षिण-मस्कासाथ पूल ते इतवारी रेल्वे क्रॉसिंग गोंदिया रेल्वे लाईनचा उत्तरेकडील भाग, पो.स्टे. लकडगंज सीमेपर्यंत.शांतिनगर ठाण्याच्या हद्दीतील लोकसंख्या अंदाजे १ लाख ४० हजार आहे. शांतिनगर बीट इतवारी रेल्वे स्टेशन, आरपीएफ क्वॉर्टर, बोहरा कॉलनी, तेलीपुरा, बांगडे प्लॉट, हनुमाननगर, मुदलियार लेआऊट, लालनगर, तुलसीनगर, साईनगर, मारवाडी वाडी, बाबा रामसुमेरनगर, मस्के लेआऊट, शांतिनगर बगीचा परिसर, स्वीपर कॉलनी, कावरापेठ, तरुणानगर, शांतिनगर कॉलनी.लालगंज बस्तरवारी बीट इतवारी दहीपुरा, भारती आखाडा, बस्तरवारी पांचदेऊळ, नयापुरा, महेशनगर, शांतिनगर, प्रेमसाईनगर, नारायणपेठ, श्रीरामवाडी, बस्तरवारी गोंडपुरा, लालगंज खैरी, बाहुली विहीर पहाडपुरा, सातपुते मोहल्ला, राऊत चौक, बारईपुरा, मस्कासाथ पूल, तेलीपुरा पेवठाभाग, कुंभारपुरा, लालगंज गुजरी, दलालपुरा, झाडे चौक.