लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भातील संत्र्याला देशभरात मागणी आहे. त्यामुळे रेल्वेने संत्रा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी किसान रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १४ ऑक्टोबरला नागपूरवरून दिल्लीसाठी किसान रेल्वे सोडण्यात येणार आहे. याबाबत शनिवारी संत्रा उत्पादकांसोबत रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी बैठक घेतली.मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार यांनी संत्रा उत्पादक तसेच व्यापाºयांसोबत बैठक घेतली. विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी संत्रा उत्पादक तसेच व्यापाऱ्यांना केंद्र शासनाच्या योजनेनुसार नागपूर विभागातून आदर्शनगर दिल्ली येथे किसान रेल्वे चालविण्यात येणार असल्याची माहिती दिली. तसेच बांगलादेशासाठी मागणीनुसार रॅक उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाने सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. या योजनेचे संत्रा उत्पादक आणि व्यापाऱ्यांनी स्वागत केले. बैठकीला अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (परिचालन) अनुप कुमार सतपथी, वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक आशुतोष श्रीवास्तव, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील आणि शाखा अधिकारी उपस्थित होते.
विदर्भातील संत्रा जाणार दिल्लीला : किसान रेल्वे धावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2020 12:05 AM
Vidarbha, Orange, Kisan Railway विदर्भातील संत्र्याला देशभरात मागणी आहे. त्यामुळे रेल्वेने संत्रा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी किसान रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १४ ऑक्टोबरला नागपूरवरून दिल्लीसाठी किसान रेल्वे सोडण्यात येणार आहे.
ठळक मुद्देसंत्रा उत्पादकांसोबत रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक