शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
3
ISRO आणि SpaceX ची भागीदारी यशस्वी, इलॉन मस्क यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
5
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
6
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
7
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
8
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
9
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
10
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
11
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
12
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
13
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
14
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
15
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
16
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
17
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
18
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
19
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
20
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार

गोसेखुर्दसाठी ५१० एकर भूसंपादनावर जैसे थे आदेश

By admin | Published: May 09, 2015 2:23 AM

गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रात येणाऱ्या अड्याळ गावातील (ता. पवनी) ५१० एकरचे भूसंपादन...

नागपूर : गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रात येणाऱ्या अड्याळ गावातील (ता. पवनी) ५१० एकरचे भूसंपादन व त्यासाठी पारित झालेल्या ४० कोटीवर रुपयांच्या निवाड्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. न्यायालयाने याप्रकरणी जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिले आहेत.यासंदर्भात महाराष्ट्र परिक्षेत्र प्रकल्पग्रस्त नागरिक संघर्ष समितीचे अध्यक्ष धनंजय मुलकलवार यांनी रिट याचिका दाखल केली आहे. अड्याळ येथे २०११ पासून भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. दरम्यान, शेकडो शेतकऱ्यांची ५१० एकर जमीन संपादित करण्यात आली. ३० आॅक्टोबर २०१४ रोजी भंडारा जिल्हाधिकाऱ्यांनी ४० कोटी २६ लाख १९ हजार ३१६ रुपयांचा निवाडा पारित केला. याचिकाकर्त्याचा यावर आक्षेप आहे. याचिकाकर्त्यानुसार, भूसंपादन व निवाड्यात अनियमितता झाली आहे. शासनाने जमीन अधिग्रहण कायद्यातील बंधनकारक तरतुदींचे पालन केलेले नाही. नवीन भूमी अधिग्रहण कायद्यानुसार मोबदला देण्यात आलेला नाही. ओलिताच्या जमिनीला कोरडवाहू जमीन दाखवून कमी मोबदला देण्यात आला आहे.(प्रतिनिधी)