शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
4
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
5
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
6
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
8
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
9
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
10
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
11
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
12
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
13
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
14
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
15
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
16
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
17
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

१७ वर्षांच्या सेवेनंतर वेतन थांबविण्याचा आदेश रद्द

By admin | Published: June 14, 2017 1:23 AM

महाविद्यालयामध्ये १७ वर्षे सेवा दिल्यानंतर एका महिला कर्मचाऱ्याचे वेतन थांबविण्याचा अमरावती विभागीय उच्च शिक्षण सहसंचालकाचा

हायकोर्टाचा शासनाला दणका : महिला कर्मचाऱ्याला दिलासा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महाविद्यालयामध्ये १७ वर्षे सेवा दिल्यानंतर एका महिला कर्मचाऱ्याचे वेतन थांबविण्याचा अमरावती विभागीय उच्च शिक्षण सहसंचालकाचा वादग्रस्त आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द केला. या निर्णयामुळे शासनाला दणका बसला तर, महिला कर्मचाऱ्याला दिलासा मिळाला. नंदा देशपांडे असे महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. १९८७ मध्ये त्यांना अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयात लिपिक /टंकलेखकपदावर तात्पुरती नियुक्ती देण्यात आली होती. १५ जुलै १९९६ रोजी त्यांना पदावर कायम करण्यात आले. २००६ मध्ये त्यांची तिवसा येथील वाय. डी. व्ही. डी. कला व वाणिज्य महाविद्यालयात बदली करण्यात आली. त्यावेळी त्यांना सेवापुस्तिकेमध्ये त्यांच्या कायम नियुक्तीची तारीख चुकीने १ आॅक्टोबर १९९९ अशी नमूद करण्यात आल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांनी उच्च शिक्षण सहसंचालकाकडे यासंदर्भात तक्रार केली. उच्च शिक्षण सहसंचालकांनी हा धागा पकडला व देशपांडे यांची कायम नियुक्ती निर्धारित वय निघून गेल्यानंतर झाल्याचे कारण नमूद करून त्यांचे वेतन थांबविण्याचा आदेश २३ आॅगस्ट २०१३ रोजी जारी केला. या आदेशाविरुद्ध देशपांडे यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता त्यांची याचिका मंजूर केली व वादग्रस्त आदेश अवैध ठरवून तो रद्द केला. उच्च शिक्षण सहसंचालकांनी देशपांडे यांच्या नियुक्तीला मान्यता देऊन त्यांना २०१३ पर्यंत वेतन दिले. देशपांडे वयाच्या अटीत बसत नव्हत्या तर, त्यांच्या नियुक्तीला सुरुवातीलाच मान्यता द्यायला नको होती असे मत न्यायालयाने आदेशात नमूद केले.