शहरं
Join us  
Trending Stories
1
हातात संविधानाची प्रत घेत प्रियंका गांधी यांनी घेतली लोकसभा सदस्यत्वाची शपथ  
2
Dada Bhuse : एकनाथ शिंदेंची माघार; दादा भुसे यांना उपमुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागणार?
3
Sanjay Raut : "...तर त्यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नये"; संजय राऊत कडाडले
4
"१२ तासांची शिफ्ट, सुटी नाही, सेटवरचं शेड्यूल खूप..."; अभिनेत्रीने सांगितला TV चा ड्रॉबॅक
5
धाड पडताच ईडीच्या टीमवर हल्ला, ईडीचे संचालक जखमी; दिल्लीतील धक्कादायक घटना
6
"त्या दोघांचं अफेयर...", कंगना राणौत-आदित्य पांचोलीच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर्सवर जरीना वहाबचा धक्कादायक खुलासा
7
Air India Express 'या' शहरांसाठी नवीन उड्डाणे सुरू करणार!
8
Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या प्रयोगाचा सर्वाधिक तोटा कोणाला झाला? काय सांगते आकडेवारी
9
KL राहुल की अक्षर पटेल? कुणाच्या गळ्यात पडणार कॅप्टन्सीची माळ? DC संघ मालकाने दिली हिंट
10
HAL, IREDA सह 'या' स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, खरेदीचा सल्ला; तेजी कायम राहण्याची शक्यता, तुमच्याकडे आहेत?
11
धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी
12
'सिंघम अगेन'बद्दल नाना पाटेकरांचं रोखठोक मत; म्हणाले - "बाकीच्या लोकांच्या कुबड्या घेण्याची..."
13
...म्हणून तिनं अखेरचा कॉल केला; एअर इंडिया महिला पायलटच्या मृत्यूआधी काय घडलं?
14
IND vs AUS : ॲडलेड टेस्ट आधी कॅनबेरात काय करतीये टीम इंडिया? BCCI नं शेअर केला व्हिडिओ
15
भयंकर! श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती; लिव्ह इन गर्लफ्रेंडचे ५० तुकडे केले अन् जंगलात फेकले
16
'पुष्पा २' प्रमोशनमधून फहाद फासिल गायब; अल्लू अर्जुन म्हणाला, "त्याच्यासोबत काम करणं..."
17
Adani Group Stocks: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी बंपर तेजी; १०% पर्यंत स्टॉक्स वधारले
18
Reshma Shinde : 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे या दिवशी बांधणार लग्नगाठ, मेहंदीच्या फोटोतून मिळाली हिंट
19
रेल्वेतील चादरी आणि ब्लँकेट किती दिवसांनी धुतात, रेल्वे मंत्र्यांनी काय दिले उत्तर?
20
Honda ACTIVA e चे बुकिंग कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या स्कूटरची रेंज आणि फीचर्स...

निको ग्रुपला १०५ कोटी जमा करण्याचे आदेश

By admin | Published: October 17, 2015 3:29 AM

उच्च न्यायालयाचे न्या. झेड. ए. हक यांच्या एकलपीठाने निको ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक अरविंद जयस्वाल ...

नागपूर : उच्च न्यायालयाचे न्या. झेड. ए. हक यांच्या एकलपीठाने निको ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक अरविंद जयस्वाल यांना १०५ कोटी रुपये उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारकडे जमा करण्याचे आदेश दिले. अभिजित ग्रुपचे संचालक अभिजित जयस्वाल यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान हे आदेश देण्यात आले. अभिजित जयस्वाल आणि अरविंद जयस्वाल यांच्यात मालमत्ता विभागणीबाबत सहमती करार झाला तेव्हा आयर्न अँड स्टील युनिटला निको ग्रुपमध्ये समायोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कंपनीला ३६५ कोटी रुपये बँकांना द्यायचे होते. ही कंपनी निको ग्रुपमध्ये समायोजित होण्याच्या अडीच वर्षांच्या कालावधीत अभिजित जयस्वाल यांनी बँकांना १०५ कोटींचे व्याज व कर्ज रकमेचा परतावा केला होता. दरम्यान ही कंपनी निको ग्रुपमध्ये समायोजित झाल्याने अभिजित जयस्वाल यांनी निको ग्रुपकडे १०५ कोटी रुपये परत करण्याची मागणी केली होती. ही रकम देण्यात न आल्याने अभिजित जयस्वाल यांनी रक्कम मिळण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या रकमेच्या वसुलीसाठी निको ग्रुप गुंडाळण्यात यावा, अशी प्रार्थनाही याचिकेत करण्यात आली होती. दरम्यान अरविंद जयस्वाल यांनी या वादावर निवृत्त न्यायाधीश व्ही.सी. डागा यांच्यापुढे सुनावणी सुरू असल्याचे आपल्या उत्तरात नमूद केले होते. या वादावर निर्णय होईपर्यंत कोणताही निर्णय घेता येणार नाही, असेही स्पष्ट केले होते. उच्च न्यायालयाने वादावरील निर्णयापर्यंत अरविंद जयस्वाल यांच्या कंपनीला १०५ कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिले. न्यायालयात अभिजित ग्रुपतर्फे अ‍ॅड. बलबीर सिंग यांनी तर निको ग्रुपतर्फे ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. सुनील मनोहर यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)