झिरो माईलची देखभाल करण्याचा आदेश जारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2020 11:19 PM2020-11-03T23:19:55+5:302020-11-03T23:21:40+5:30

Zero Mile maintain Order, Nagpur news जिल्हाधिकाऱ्यांनी सिव्हिल लाईन्स येथील ग्रेड-१ हेरिटेज झिरो माईलचा ताबा स्वत:कडे घेतला आहे. तसेच, सार्वजनिक बांधकाम विभागाला या हेरिटेजची देखभाल करण्याचे निर्देश जारी केले आहेत.

Order issued to maintain Zero Mile | झिरो माईलची देखभाल करण्याचा आदेश जारी

झिरो माईलची देखभाल करण्याचा आदेश जारी

Next
ठळक मुद्देहायकोर्टाला दिली माहिती : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला ताबा

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : जिल्हाधिकाऱ्यांनी सिव्हिल लाईन्स येथील ग्रेड-१ हेरिटेज झिरो माईलचा ताबा स्वत:कडे घेतला आहे. तसेच, सार्वजनिक बांधकाम विभागाला या हेरिटेजची देखभाल करण्याचे निर्देश जारी केले आहेत. देखभालीचे काम येत्या एक-दोन दिवसात सुरू केले जाणार आहे.

राज्य सरकारने मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला ही माहिती दिली. यासंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित आहे. त्यावर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्या. रवी देशपांडे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. गेल्या तारखेला न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना झिरो माईलचा ताबा घेण्यास व त्याची देखभाल करण्यास सांगितले होते. त्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. या प्रकरणावर आता २५ नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

Web Title: Order issued to maintain Zero Mile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.