शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

विदर्भ हॉकी संघाला राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी करून घेण्याचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 1:09 AM

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी विदर्भ सब-ज्युनियर महिला हॉकी संघाला नवव्या अखिल भारतीय सब-ज्युनियर महिला हॉकी राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी करून घेण्यात यावे, असा आदेश हॉकी इंडियाला दिला.

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी विदर्भ सब-ज्युनियर महिला हॉकी संघाला नवव्या अखिल भारतीय सब-ज्युनियर महिला हॉकी राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी करून घेण्यात यावे, असा आदेश हॉकी इंडियाला दिला. ही स्पर्धा राजस्थानमधील सिकर येथे १५ ते २५ मे दरम्यान होणार आहे.विदर्भ संघातील खेळाडूंना स्पर्धेत सहभागी करून घेण्यापूर्वी त्यांचे वय व इतर आवश्यक बाबींची नियमानुसार पडताळणी करण्यात यावी. तसेच, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खेळाडूंवर हॉकी इंडियाला योग्य ती कारवाई करता येईल, असेही न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले आहे. विदर्भ हॉकी संघटनेतील दोन गटांमध्ये वाद सुरू आहे. त्यामुळे हॉकी इंडियाने संघटनेची सदस्यता निलंबित केली असून त्यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. १६ एप्रिलला न्यायालयाने संघटनेवर प्रशासकाची नियुक्ती करण्याचा आदेश धर्मादाय उपायुक्तांना दिला होता. तसेच, संघटनेमध्ये सर्वकाही सुरळीत होतपर्यंत सर्वसंमत निवड समिती विविध राष्ट्रीय हॉकी स्पर्धांसाठी विदर्भ संघाची निवड करेल असे स्पष्ट केले होते.निवड समितीने संघाची निवड केली. संघ स्पर्धास्थळी पोहोचला. परंतु, खेळाडूंची निर्धारित वेळेत माहिती कळविण्यात न आल्यामुळे व विरोधी गटाने खेळाडूंच्या निवडीवर आक्षेप घेतल्यामुळे हॉकी इंडियाने या संघास स्पर्धेत सहभागी करून घेण्यास नकार दिला आणि यासंदर्भात योग्य खुलासा होण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मूळ याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. रोहित शर्मा तर, हॉकी इंडियातर्फे अ‍ॅड. रितेश बढे यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्ट