शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
2
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
3
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
4
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
5
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
6
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
7
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
8
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
9
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
10
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
11
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
12
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
13
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
14
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
15
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
16
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
17
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
18
Rosmerta Digital Services IPO : उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
19
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
20
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक

दंडाचे चार लाख रुपये शंकरबाबा पापळकर यांच्या बालगृहाला देण्याचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 6:54 PM

माणुसकीचा गहिवर ज्यांच्या हृदयात आहे, त्यांना कारुण्यऋषी शंकरबाबा पापळकर हे नाव अपरिचित नाही. अमरावती जिल्ह्यातील परतवाडानजीकच्या वज्झर फाटा येथे शंकरबाबांचे स्वर्गीय अंबादासपंत वैद्य मतिमंद, मूकबधिर, बेवारस बालगृह आहे. या बालगृहात मतिमंद, मूकबधिर व बेवारस जीवांचे संगोपन व पुनर्वसन केले जाते. या परमपुण्याच्या कार्यासाठी शंकरबाबांनी स्वत:ला अर्पण केले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व रोहित देव यांनी बुधवारी एका प्रकरणातील दंडाचे चार लाख रुपये या बालगृहाला देऊन सामाजिक दायित्व जपले. या रकमेमुळे शंकरबाबांच्या कार्याला मोठा हातभार लागणार आहे.

ठळक मुद्देहायकोर्टाने जपले सामाजिक दायित्व : मतिमंद, मूकबधिर व बेवारस जीवांचे आश्रयस्थान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : माणुसकीचा गहिवर ज्यांच्या हृदयात आहे, त्यांना कारुण्यऋषी शंकरबाबा पापळकर हे नाव अपरिचित नाही. अमरावती जिल्ह्यातील परतवाडानजीकच्या वज्झर फाटा येथे शंकरबाबांचे स्वर्गीय अंबादासपंत वैद्य मतिमंद, मूकबधिर, बेवारस बालगृह आहे. या बालगृहात मतिमंद, मूकबधिर व बेवारस जीवांचे संगोपन व पुनर्वसन केले जाते. या परमपुण्याच्या कार्यासाठी शंकरबाबांनी स्वत:ला अर्पण केले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व रोहित देव यांनी बुधवारी एका प्रकरणातील दंडाचे चार लाख रुपये या बालगृहाला देऊन सामाजिक दायित्व जपले. या रकमेमुळे शंकरबाबांच्या कार्याला मोठा हातभार लागणार आहे.नागपूर जिल्हा जात प्रमाणपत्र वैधता पडताळणी समितीने उच्च न्यायालयाचा अवमान केल्यामुळे समितीचे सदस्य विनोद पाटील, नितीन तायडे, मनोज चव्हाण व संशोधन अधिकारी रोशना चव्हाण यांच्यावर प्रत्येकी एक लाख रुपये दंड ठोठावून त्यांना ही रक्कम २७ सप्टेंबर रोजी सायंकाळपर्यंत शंकरबाबांच्या बालगृहात जमा करण्याचा आदेश देण्यात आला. तसेच, रक्कम जमा केल्याची पावती २८ सप्टेंबर रोजी न्यायालयात सादर करण्यास सांगण्यात आले. ही रक्कम बालगृहात जमा न केल्यास अवमानना कारवाई पुनरुज्जीवित करून आवश्यक शिक्षा सुनावली जाईल, अशी तंबीही सदस्यांना देण्यात आली.हे प्रकरण अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रदीप डांगे यांचा मुलगा श्रेयस याच्या हलबा अनुसूचित जमाती वैधता प्रमाणपत्र दाव्याशी संबंधित आहे. समितीने प्रदीप डांगे व सध्या जळगाव महापालिकेचे आयुक्त असलेले त्यांचे भाऊ चंद्रकांत डांगे यांना हलबा अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र देण्यास नकार दिला होता. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने अभिलेखावरील पुरावे लक्षात घेता, दोघांनाही हलबा अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र जारी करण्याचा आदेश दिला होता. काही महिन्यांपूर्वी श्रेयसने या दोघांचे वैधता प्रमाणपत्र व उच्च न्यायालयाचे आदेश जोडून सादर केलेला हलबा अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र मिळण्याचा दावा समितीने खारीज केला. त्यामुळे श्रेयसनेही उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने त्याच्या याचिकेतील तथ्यांचे अवलोकन केल्यानंतर समिती सदस्यांवर अवमानना कारवाई सुरू केली होती. परंतु, सदस्यांनी माफी मागितल्यामुळे त्यांच्यावर केवळ दंड ठोठावून दंडाची रक्कम बालगृहाला देण्यास सांगण्यात आले.समितीकडून काम काढून घेतलेया प्रकरणातील समितीच्या सदस्यांकडून जात प्रमाणपत्र वैधतेचे दावे पडताळण्याचे काम त्वरित काढून घेण्यात यावे व बुद्धी लावण्याची गरज नाही असे काम त्यांना देण्यात यावे, असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले. एवढेच नाही तर समितीच्या सदस्यांची चांगली खरडपट्टीही काढली. उच्च न्यायालयाने वडील व काकाला हलबा अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र देण्याचा निर्णय दिला असताना, समिती याचिकाकर्त्याचा दावा स्वतंत्रपणे तपासण्याचे धाडस कसे करू शकते. याशिवाय समितीची कृती ‘अपूर्वा निचळे’ व ‘आनंद’ प्रकरणातील निर्णयांचेही उल्लंघन करणारी आहे. त्यावरून समिती बेअक्कलपणे कर्तव्य बजावत असल्याचे दिसून येते. समितीचे वागणे न्यायालयाचा अवमान करणारे आहे, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने निर्णयात नोंदविले. याचिकाकर्त्याच्या वतीने अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांनी बाजू मांडली.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयOrder orderआदेश केणे