शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
आजचे राशीभविष्य : शुक्रवार 1 नोव्हेंबर 2024; आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
4
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
5
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
6
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
7
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
8
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
9
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
10
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
11
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
12
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
13
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
14
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
15
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
16
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
17
इस्रायली महिला फायटर्सचे इराणवर हल्ले!
18
११ वर्षीय पीडितेच्या गर्भपातास परवानगी; रक्त नमुना, टिश्यू जतन करण्याचे निर्देश 
19
‘राज’ की बात, भाजप अन् शिंदेंची अडचण!
20
दिवाळी, छटपूजेनिमित्त मध्य रेल्वेच्या ५८३ गाड्या

विधिसंघर्षग्रस्त बालकाविरुद्ध सत्र न्यायालयात खटला चालविण्याचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 11:35 PM

खळबळजनक कांबळे दुहेरी खूनप्रकरणातील अल्पवयीन आरोपीविरुद्ध सज्ञान आरोपींप्रमाणे सत्र न्यायालयात खटला चालविण्यात यावा, असा महत्त्वपूर्ण आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. बी. कुलकर्णी यांनी दिला आहे. याकरिता राज्य सरकारने अपील दाखल केले होते.

ठळक मुद्देनागपुरातील कांबळे दुहेरी खूनप्रकरण : राज्य सरकारची विनंती मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्क  नागपूर : खळबळजनक कांबळे दुहेरी खूनप्रकरणातील अल्पवयीन आरोपीविरुद्ध सज्ञान आरोपींप्रमाणे सत्र न्यायालयात खटला चालविण्यात यावा, असा महत्त्वपूर्ण आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. बी. कुलकर्णी यांनी दिला आहे. याकरिता राज्य सरकारने अपील दाखल केले होते.बाल न्याय कायद्यांतर्गत अल्पवयीन आरोपीविरुद्ध बाल न्याय मंडळामध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. परंतु, हे प्रकरण अत्यंत गंभीर स्वरूपाचे असल्यामुळे राज्य सरकारने या आरोपीविरुद्ध सत्र न्यायालयात खटला चालविण्याची अनुमती मिळविण्यासाठी बाल न्याय मंडळात अर्ज दाखल केला होता. गेल्या १९ जून रोजी बाल न्याय मंडळाने तो अर्ज खारीज करून अल्पवयीन आरोपीविरुद्ध बाल न्याय मंडळासमक्षच खटला चालेल, असा आदेश दिला. त्याविरुद्ध राज्य सरकारने सत्र न्यायालयात अपील दाखल केले होते. अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. बी. कुलकर्णी यांनी विविध बाबी लक्षात घेता, सरकारचे अपील मंजूर करून बाल न्याय मंडळाचा वादग्रस्त आदेश रद्द केला.प्रकरणातील अन्य आरोपींमध्ये गणेश शाहू, गुडिया शाहू व अंकित शाहू यांचा समावेश आहे. आरोपींनी गेल्या १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५७ वर्षीय उषाताई सेवकदास कांबळे व त्यांची दीड वर्षाची नात राशी कांबळे यांचा निर्घृण खून केला. त्यानंतर दोघांचेही शव पोत्यात भरून विहीरगाव येथील नाल्यात फेकून दिले. गुन्हा उघडकीस आल्यानंतर चारही आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३०२, ३६४, ३९४, १२०(ब), २०१, ३४ व अ‍ॅट्रॉसिटी कायद्याच्या सहकलम ३ (२) ५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेच्या वेळी अल्पवयीन आरोपीचे वय १७ वर्षे ८ महिने होते. सत्र न्यायालयात सरकारतर्फे अ‍ॅड. नितीन तेलगोटे, आरोपीतर्फे अ‍ॅड. चेतन बर्वे तर, फिर्यादी रविकांत कांबळेतर्फे अ‍ॅड. समीर सोनवणे यांनी कामकाज पाहिले.सत्र न्यायालयाची निरीक्षणे

  •  बाल न्याय मंडळाने मनोचिकित्सक व बाल अधिकाऱ्यांचा अभिप्राय चांगल्या पद्धतीने लक्षात घेतला नाही.
  •  मंडळाच्या आदेशामध्ये विविध बाबतीत विरोधाभास दिसून येत आहे.
  •  अल्पवयीन आरोपी मानसिक व शारीरिकदृष्ट्या स्वत:च्या कृत्याचे परिणाम जाणून घेण्यास सक्षम असल्याचे मनोचिकित्सक व परीविक्षा अधिकारी यांच्या अभिप्रायावरून दिसून येते.
  •  गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता, या आरोपीविरुद्ध अन्य सज्ञान आरोपींप्रमाणे सत्र न्यायालयात खटला चालविणे आवश्यक आहे.
टॅग्स :District Session court of Nagpurनागपूर जिल्हा व सत्र न्यायालयMurderखून