शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

नागपुरातील भाजप नगरसेवकांना ‘रिपोर्ट कार्ड’ सादर करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 10:16 AM

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. गेल्या वर्षभराचे ‘रिपार्ट कार्ड’ सत्तापक्ष नेते यांच्याकडे सादर करा, असे निर्देश भाजपाचे शहर अध्यक्ष आ. सुधाकर कोहळे यांनी दिले.

ठळक मुद्देशहर अध्यक्षांनी घेतला नगरसेवकांचा क्लासबैठकीस अनुपस्थित राहणे खपविले जाणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. महापालिकेत विक्रमी बहुमत असूनही बहुसंख्य नगरसेवकांचे विकास कामांकडे दुर्लक्ष असल्याने प्रभागातील नागरिक नाराज आहेत. याचा फटका आगामी निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी विधानसभा क्षेत्रनिहाय भाजपा नगरसेवकांचा वर्षभरातील कामकजाचा आढावा घेण्यात आला. यात अनेकांची कामगिरी चांगली नसलेल्यांना धारेवर धरून पक्ष आदेशानुसार सर्वांना काम क रा, बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही. गेल्या वर्षभराचे ‘रिपार्ट कार्ड’ सत्तापक्ष नेते यांच्याकडे सादर करा, असे निर्देश भाजपाचे शहर अध्यक्ष आ. सुधाकर कोहळे यांनी दिले.गणेशपेठ येथील भाजपाच्या पक्ष कार्यालयात विधानसभा क्षेत्रनिहाय तब्बल सहा तास बैठक घेण्यात आली. यावेळी महापौर नंदा जिचकार, आमदार प्रा. अनिल सोले, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, डॉ. मिलिंद माने, स्थायी समितीचे अध्यक्ष संदीप जाधव, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, उपेंद्र कोठेकर,भोजराज डुम्बे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी थेट नगरसेवकांशी संवाद साधला.वर्षभरात पक्षाच्या बैठकांना नगरसेवकांची उपस्थिती, पक्ष संघटना बळकट करण्यात असलेले योगदान, महापालिका सभागृहातील योगदान याचा आढावा घेण्यात आला. पक्षाच्या बैठकांना अनुपस्थित राहणाऱ्यांना असा प्रकार यापुढे खपवून घेतला जाणार नाही, अशी तंबी देण्यात आली. पुढील वर्षात लोकसभेच्या निवडणुका आहेत. विधानसभा निवडणूक मुदतपूर्व झाल्यास निवडणुकीसाठी सज्ज असले पाहिजे. याचा विचार करता नगरसेवकांनी प्रभागातील बूथचे पालक त्व स्वीकारून नागरिकांशी संपर्क वाढवावा, असा सल्ला देण्यात आला.

मते कमी पडल्यास नगरसेवक जबाबदारप्रभागातील बूथच्या पालक त्वाची जबाबदारी नगरसेवकांवर सोपविण्यात आली आहे. बूथनिहाय कामाला लागा, पक्ष संघटना बळकट करा. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांना प्रभागातील बूथवर मते कमी पडल्यास नगरसेवकांना जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

महिलांनी कामकाजात सहभाग घ्यावामहापालिका सभागृहात भाजपाच्या बहुसंख्य नगरसेविका बोलत नाही. त्यांनी सभागृहात बोलावे. आपल्या प्रभागातील समस्या उपस्थित करून कामकाजात सहभाग घ्यावा. पक्षाच्या व्यासपीठावरही महिलांनी आपली बाजू मांडली पाहिजे, असा सल्ला देण्यात आला.

पक्षशिस्त म्हणून राजीनामेपक्षशिस्तीचा कुणी भंग केल्यास कारवाई करता यावी, यासाठी १५ दिवसांपूर्वी भाजपा नगरसेवकांचे राजीनामे घेण्यात आले़ मात्र राजीनामे घेतल्याने अनेक नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली होती़ बैठकीत अशा नगरसेवकांची समजूत काढण्यात आली़ पक्षशिस्तीचा हा भाग असल्याचे सांगण्यात आले़. तसेच नगरसेवकांच्या अडचणी जाणून घेतल्या.

बैठकीत थेट संवादविधानसभा क्षेत्रनिहाय आढावा बैठकीत शहर अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी नगरसेवकांशी थेट संवाद साधला. सभागृहातील कामाकाजात सहभाग, प्रभागातील विकास कामे, पक्षाचे कार्यक्रम व बैठकांना उपस्थिती याची माहिती घेण्यात आली. पक्ष संघटनेत अनेक नगरसेवकांचे योगदान नसल्याने त्यांना जाब विचारण्यात आला.

सभागृहातील ‘मौनव्रत’ सोडाभाजपाचे काही मोजके नगरसेवक सोडल्यास बहुसंख्य नगरसेवक सभागृहात मौनव्रत धारण करतात. प्रभागातील समस्या सभागृहात मांडत नाही. यामुळे नागरिकांत नाराजी आहे. नगरसेवकांनी प्रभागातील समस्या सभागृहात मांडल्या पाहिजेत. पक्षातील अंतर्गत वाद खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा देण्यात आला.

पतीराजांचा कामकाजात हस्तक्षेप नकोनगरसेवकांच्या कामाबाबतही नागरिकांच्या तक्रारी असलेल्यांना बैठकीत पदाधिकाऱ्यांनी तंबी दिली़ तसेच काही नगरसेविकांचे पतीच प्रभागात फिरतात़ यामुळे उलटसुलट चर्चा होते. अधिकारीही नाराजी व्यक्त करतात. महिला नगरसेविकांनी आता सक्रिय व्हावे, असे बजावण्यात आले़ दरम्यान, बैठकीला नगरसेविकांसह काहींचे पतीही आले होते़ मात्र पतींना बाहेर थांबविण्यात आले होते़

टॅग्स :BJPभाजपाNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका