शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
2
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
3
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
4
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
5
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
6
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
7
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
8
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
9
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
10
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
11
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
12
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
13
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
14
Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस?
15
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
16
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
17
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
18
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
19
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
20
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी

आता ऑनलाईनही अवयवदानाचा अर्ज भरणे शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 7:31 PM

‘नागपूर ऑब्स्टेस्ट्रिक अ‍ॅण्ड गायनॉकॉलॉजिकल सोसायटी’ (एनओजीएस) १ जुलै रोजी ‘जागतिक डॉक्टर दिना’निमित्त अवयवदान जनजागृत कार्यक्रम व मोबाईलवरच अवयवदान करण्याची लेखी प्रतिज्ञा ऑनलाईन पद्धतीने भरण्याच्या उपक्रमास सुरुवात करणार आहे.

ठळक मुद्दे ‘एनओजीएस’चा पुढाकार : जागतिक डॉक्टर दिनी अवयवदानावर जनजागृती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपल्याला डोळे, त्वचा, यकृत, हृदय, मूत्रपिंड ही निसर्गाने दिलेली अवयवरूपी भेट. आपल्या मृत्यूनंतर आपण इतर गरजूंना हे अवयव दान देऊशकतो. या अवयव दानाने मृत्यूच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या अनेक रुग्णांना दुसरे जीवन जगण्याची संधी देऊ शकतो. शिवाय, जिवंतपणीसुद्धा आपण रक्त व ‘टिश्यू’ दान करून सुमारे ७५ रुग्णांना जीवनदान देऊ शकतो. अवयवदानाची ही चळवळ घराघरापर्यंत पोहचविण्यासाठी व यातील गैरसमजुती दूर करण्यासाठी ‘नागपूर ऑब्स्टेस्ट्रिक अ‍ॅण्ड गायनॉकॉलॉजिकल सोसायटी’ (एनओजीएस) १ जुलै रोजी ‘जागतिक डॉक्टर दिना’निमित्त अवयवदान जनजागृत कार्यक्रम व मोबाईलवरच अवयवदान करण्याची लेखी प्रतिज्ञा ऑनलाईन पद्धतीने भरण्याच्या उपक्रमास सुरुवात करणार आहे.‘एनओजीएस’च्या अध्यक्ष डॉ. वैदेही मराठे व सचिव डॉ. राजसी सेनगुप्ता यांनी सांगितले, अवयवदान करणे हे एक महान कार्य आहे. वेळेत अवयव न मिळाल्याने दरवर्षी सुमारे पाच लाख लोकांचा जीव जातो. यामुळे जिवंतपणी व मृत्यूपश्चात जास्तीत जास्त अवयवदान होणे आवश्यक आहे. अवयवदानाला घेऊन अनेक गैरसमजुती आहेत. त्यासुद्धा दूर होणे गरजेचे आहे. यावर प्रकाशझोत टाकण्यासाठी बुधवारी एक ऑनलाईन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये ‘अवयवदानाची गरज, गैरसमजुती व जनजागृती’ या विषयावर चर्चा केली जाईल. सर्वसामान्यांसाठी व डॉक्टरांसाठी ऑनलाईन परिषद, ‘ई-कॉन्क्लेव्ह’ आयोजित करण्यात आली आहे. यात संपर्ण दान, रक्तदान तसेच अवयवदानाची दंतकथा या विषयावर तज्ज्ञ मार्गदर्शन करतील.‘कोविड-१९’च्या काळात एकमेकांना भेटणे अवघड आहे. यावर उपाय म्हणून अवयवदानासाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी आॅनलाईन लेखी प्रतिज्ञापत्र उपलब्ध करून दिले आहे. मोबाईलवरही अवयवदानाचा अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे. भरलेला अर्ज प्राप्त होताच ‘नोटो’कडून एक देणगी कार्डही उपलब्ध होणार आहे. हे कार्ड सुरक्षितपणे ठेवणे अधिक सोपे असल्याचेही त्यांनी सांगितले. ज्याना ऑनलाईन अवयवदानाचा अर्ज भरावयाचा आहे त्यांनी ‘नागपूर ऑब्स्टेस्ट्रिक अ‍ॅण्ड गायनॉकॉलॉजिकल सोसायटी’शी संपर्क साधावा, असे आवाहनही डॉ. मराठे व डॉ. सेनगुप्ता यांनी केले आहे.

टॅग्स :Organ donationअवयव दानdoctorडॉक्टर