लोकमत विशेषराहुल अवसरे नागपूरकारागृहात मोठ्या रकमा घेऊन आणि कायद्याचा भंग करून संघटित गुन्हेगारी टोळ्यातील सदस्यांना एकाच बराकीत एकत्र ठेवले जात होते, अशी धक्कादायक माहिती कारागृहातील जुन्या कैद्याने स्वत:चे नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर प्रस्तुत प्रतिनिधीला मोबाईल फोनवर दिली. हितचिंतक असल्याचे सांगणाऱ्या या कैद्यासोबत झालेला संवाद असा, हॅलो,साहेब नमस्कारजी शुभचिंतक बोलतोप्रतिनिधी : अरे बोला, आताच तुमची आठवण झाली.धन्यवाद धन्यवाद माहिती दिल्याबद्दलआता नवीन काय ?हितचिंतक : नवीन म्हणजे हे आहे की यातील सूत्रधार पारेकर म्हणून जेलर आहे.प्रतिनिधी : अच्छा तारेकर. हितचिंतक : नाही पारेकर... पारेकर, आणि त्या पारेकरने पैसे घेऊन त्यांना एकाच बॅरकमध्ये ठेवले होते. जेव्हा की, सर्वांना अलगअलग ठेवले जाते. पारेकर जेलरने राजा गौसच्या नंबरकाऱ्यांकडून पैसे घेऊन त्यांना एकाच बॅरकमध्ये ठेवले होते . पारेकर जेलरच कर्मचाऱ्यांच्या दिवट्या बदलवत होता आणि लावत होता. अमूक सर्कलला कोण पाहिजे, का पाहिजे. तोच हजेरी मास्टरला निर्देश देऊन ड्युट्या लावत होता. सर्कलमध्ये ड्युटी लावायचे. पारेकर जेलर सुप्रिटेन्डंट वैभव कांबळे यांना ४० हजार रुपये महिना देत होता. तिथे पहिले खरडे म्हणून जेलर होता. त्याची नोकरी त्याने बदलवून स्वत: पारेकरने तिथे आपली ड्युटी लावून घेतली होती. पारेकर जेलरने स्वत:च्या मनमर्जीचे कर्मचारी पण ठेवून घेतले. हजरी मास्टर जे कर्मचारी तिथं ठेवत होता. तो त्यांची ड्युटी बदलवून लावायचा. फिक्स ड्युट्याचे पैसेही तो सुप्रिडेन्डंटला पोहोचवत होता. मुलाखतमध्येही तो त्याच्याच मर्जीचे माणसे ठेवायचा. त्यामुळे आत सर्रास शाली आणि दऱ्या जात होत्या. त्यासाठी आरोपींच्या घरच्या लोकांकडून ५००-५०० रुपये घ्यायचा. आता धाड मारली तर जेलमध्ये कमीत कमी २ ते ३ हजार कंबल, शाली आणि चादरी निघतील. जेव्हा की... या सर्व बाहेरून आत पोहोचल्या आहेत.मर्डरवाल्यांना मर्डर बॅरकमध्ये न ठेवता तो आपल्या मनमर्जीने कोणत्याही बॅरकमध्ये ठेवत होता. प्रतिनिधी : अच्छा मग. हितचिंतक : सर्व नंबरकाऱ्यांना एकत्र ठेवायचे तो पैसे घेतो. आज मोंटी सरदार खुनातील दिवाकर कोथुलवारचे नंबरकारी एकत्र आहेत. बैसवारे खुनातील कालू हाटेचे नंबरकारी एकत्र आहेत. कांबळे साहेबांनी राजा गौसला अंडा सेलमधून काढायचे ५० हजार रुपये घेतले होते. पान २ वर8प्रतिनिधी : या गोष्टीला किती दिवस झाले? हितचिंतक : आठ महिने झाले. जेव्हा की, कोर्टाचे निर्देश होते की, त्याला अतिसुरक्षामध्ये ठेवा. तरी पण पैसे घेऊन त्याला अंडासेलमधून काढले. प्रतिनिधी : कुठे ठेवले त्याला?हितचिंतक : जनरलमध्ये, छोटी गोलमध्ये. बरीचशी अशी प्रकरणे सुप्रिडेन्ट करीत होते. फिस्क ड्युट्यांचेही पैसे घेत होते. जिथे जिथे फिस्क ड्युटी द्यायची आहे जसे कारखाना किंवा मुलाखत त्याचेही पैसे घ्यायचे. कार वॉशिंग सेंटरच्या ड्युटीसाठी २० हजार रुपये महिना. कॅन्टिन जे जेलच्या आतमध्ये आहे त्याचे २० हजार रुपये महिना. जेलच्या कॅन्टिनमध्ये जे कर्मचारी राहतात तिथे ड्युटी लावायचे २०-२० हजार रुपये महिना घेतो. बाहेरमध्ये जी कॅन्टिन आहे त्याचे १० हजार रुपये घेतो. ज्यांना अनुभव नाही अशा कर्मचाऱ्यांना पैसे घेऊन कॅँटिन, वॉशिंग सेंटरवर ठेवले जाते. मेन सूत्रधार आहे पारेकर जेलर. एवढं हे सर्व प्रकरण घडलं त्याचाही मेन सूत्रधार आहे पारेकर. तो बडी गोलचा इंचार्ज आहे. त्याने तिथं निगराणी ठेवायला पाहिजे होती. बाकीच्या कर्मचाऱ्यांच्या जशा ड्युट्या बदलतात तशी त्याची ड्युटी बदलत नाही. तो खास मेन जबाबदार आहे. तोच अधीक्षकाला पैसे पुरवित होता. तो अधीक्षकाच्या मनमर्जीतला माणूस होता आणि त्याच्याच मार्फत पैसे अधीक्षकाला जात होते. कमीतकमी महिन्यातून १० लाख रुपये. हे पैसे तो बडी गोलमधून उकळायचा आणि अर्धे पैसे अधीक्षकाला आणि अर्धे पैसे स्वत: ठेवत होता. कांबळे साहेबांना महिन्यात १० लाख रुपये मिळायचे त्यांच्यावर तर सीबीआयची धाड पडली पाहिजे, आयकर विभागाची धाड पडली पाहिजे. दीड वर्षात त्याने कमीतकमी एक ते दीड करोड रुपये कमविला. ५० ठिकाणी खाते आहेत, त्याचे आणि त्याच्या मिसेसच्या नावाचे आणि सगळा पैसा तो औरंगाबादला पाठवितो. अच्छा, ठीक आहे. मी उद्या भेटीन साहेब.प्रतिनिधी : कैदी शाल बांधून पळाले असतील की चादरी बांधून ?हितचिंतक : होय, शाल चांदरी बांधून, तुम्ही जे लिहलं नं ते बरोबर लिहिले.प्रतिनिधी : बरं ते कुदले कसे असतील, खाली कशा उड्या कशा घेतल्या? हितचिंतक : त्यांच्यापाशी साधन होतं न साहेब. मोबाईल वगैरे आत खूप आहे, त्यामुळे बाहेरून माणसं बोलावली. चुनाभट्टी भागातून कारमधून ते पळून गेले. त्यांनी आधीच वाहन वगैरेची सर्व व्यवस्था करून ठेवली होती. आजही धाड घातली तर प्रत्येक बॅरकमध्ये ५० ते ६० मोबाईल सापडतील. बरे, फोन ठेवतो. प्रतिनिधी : अच्छा. हितचिंतक : माझे नाव गुपित राहू द्या साहेब.
संघटित गुन्हेगारांना ठेवले जायचे एकत्र
By admin | Published: April 02, 2015 2:27 AM