नागपूर : प्रयोगशील शेतकरी दरवर्षी उत्पादन वाढविण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करतात आणि भरघोस उत्पादन घेतात. या प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागाने खरीप हंगाम २०२१ साठी पीक स्पर्धेचे आयोजन केले आहे.
खरीप हंगाम पीक स्पर्धेमध्ये सोयाबीन, भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, भूईमुग, सूर्यफूल अशा ११ पिकांचा समावेश करण्यात आला आहे. स्पर्धेसाठी प्रत्येक तालुक्यात स्पर्धकांची किमान संख्या सर्वसाधारण गटासाठी १० तर आदिवासी गटासाठी ५ इतकी आवश्यक आहे. स्पर्धेत सहभागी शेतकऱ्यांच्या शेतावर त्या पिकाखाली किमान १० आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक राहणार आहे. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत सहभाग नोंदविता येईल. ३१ जुलै २०२१ पर्यंत मूग व उडीद या पिकांकरिता अर्ज करण्याची मुदत आहे. तर भात, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, भूईमुग व सूर्यफूल या पिकांकरिता अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०२१ आहे. अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित पिकाची स्पर्धा तालुका कृषी अधिकारी जाहीर करतील. याशिवाय तालुक्यात जर पीक कापणी प्रयोग घ्यावयाचा असल्यास किमान संख्या सर्वसाधारण गटासाठी पाच व आदिवासी गटाकरिता चार राहणार आहे.
- असे आहे बक्षिसाचे स्वरूप
स्पर्धा पातळी पहिले दुसरे तिसरे
तालुका ५००० ३००० २०००
जिल्हा १०,००० ७००० ५०००
विभाग २५,००० २०,००० १५,०००
राज्य ५०,००० ४०,००० ३०,०००