शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
4
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
6
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
7
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
8
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
9
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
10
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
11
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
12
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
13
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
14
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
15
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
16
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
18
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
20
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक

नागपुरात २० डिसेंबरपासून महाराष्ट्र खाद्य महोत्सवाचे आयोजन; राज्यभरातील पदार्थांचे ४० स्टॉल्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 9:39 PM

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व लोकमाता सुमतीताई सुकळीकर स्मृती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने २० ते २५ डिसेंबरपर्यंत सिव्हिल लाईन्स येथील दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या परिसरात महाराष्ट्र खाद्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

ठळक मुद्देना. मदन येरावार यांची माहिती एक लाखावर नागरिक लाभ घेण्याची अपेक्षा

आॅनलाईन लोकमतनागपूर : महोत्सवात राज्यभरातील प्रसिद्ध व्यंजनांचे ४० स्टॉल्स राहणार असून एक लाखावर नागरिक महोत्सवाचा लाभ घेतील अशी आयोजकांना अपेक्षा आहे. गेल्यावर्षी सुमारे ६० हजार नागरिकांनी महोत्सवातील स्वादिष्ट व्यंजनांचा आस्वाद घेतला होता.पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत महोत्सवाची माहिती दिली. २० डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येईल. याप्रसंगी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व पर्यटन मंत्री जयकुमार रावल प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. महाराष्ट्रातील खाद्य पदार्थ जगभरात प्रसिद्ध आहेत. त्या पदार्थांची लोकप्रियता आणखी वाढावी हा या महोत्सवाचा उद्देश आहे. महोत्सवामध्ये कोकणातील माशांचे विविध प्रकार, मालवणमधील कोंबडी वडे, मटण करी, खान्देशातील भरली वांगी, शेव भाजी, विदर्भातील सावजी, वडा पाव, पोहे इत्यादी पदार्थांचे स्टॉल्स राहणार आहेत असे येरावार यांनी सांगितले.महोत्सवाचे औचित्य साधून अमरावती-यवतमाळ-वणी खाण पर्यटन सहलीची सुरुवात करण्यात येणार आहे. तसेच, बोदलकसा या पर्यटनस्थळाची ओळख करून देण्यात येणार आहे. या ठिकाणी भव्य धरण व अन्य आकर्षक स्थळे आहेत. हे ठिकाण नागपूरपासून १३५ किलोमीटर अंतरावर आहे. महोत्सवादरम्यान मराठी गायिका सावनी रवींद्र यांचा कार्यक्रम, एलएडी महाविद्यालयाचा फॅशन शो, लावणी नृत्य, रॉक शो, लोकनृत्य इत्यादी कार्यक्रमही सादर केले जाणार आहेत याकडे येरावार यांनी लक्ष वेधले.पत्रकार परिषदेत पर्यटन व सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे, महाव्यवस्थापक स्वाती काळे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. उदय बोधनकर, सचिव ज्योत्स्ना पंडित आदी उपस्थित होते.राज्यात टुरिझम कॅरिडॉरपर्यटनाला चालना देण्यासाठी राज्यात टुरिझम कॅरिडॉर तयार करण्यात येणार असून त्याचे काम लवकरच सुरू होईल अशी माहिती येरावार यांनी दिली. पर्यटनस्थळी दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येतील व राज्यातील पर्यटनस्थळांचे जगभर ब्रॅन्डिंग करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

 

टॅग्स :foodअन्न