लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : समाजातील गरीब, वंचित घटकांच्या कल्याणाची बांधिलकी जोपासण्याचा एक भाग म्हणून जैन सहेली मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मंगळवार २६ मार्च रोजी नि:शुल्क महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीमती ज्योत्स्ना दर्डा मेमोरियल वूमन डेव्हलपमेंट अॅन्ड वेल्फेअर सेंटर ६, जैन सहेली मंडळ, पी-६०, आर अॅन्ड सी झोन, इरा इंटरनॅशनल शाळेजवळ, एमआयडीसी इंडस्ट्रीयल परिसर, बुटीबोरी येथे सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत आयोजित हे शिबिर सर्वांसाठी नि:शुल्क आहे.लोकमत व जैन सहेली मंडळ, नागपूरद्वारा आयोजित या शिबिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) व शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाचा तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश असणार आहे. महिला व बालकांच्या सक्षमीकरणाचाच एक भाग म्हणून या भव्य नि:शुल्क आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या आरोग्य शिबिरात शासकीय दंत रुग्णालयाची अद्ययावत ‘डेंटल व्हॅन’ उपलब्ध असणार आहे. दातांच्या विविध विकारासोबतच मुखाच्या कर्करोगाचीही तपासणी केली जाईल. मेडिकल रुग्णालयाकडून नेत्र तपासणी, चष्म्याचे नंबर काढण्यापासून ते डोळ्यांचे आजार, हृदयविकार, हाडांचे आजार, बालकांचे आजार, कान-नाक-घशाचे आजार, महिलांचे आजार, त्वचेचे आजार, श्वसन व दम्याचे आजार आदी तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासले जातील. शिबिरात विविध कर्करोग, सामान्य शस्त्रक्रिया तज्ज्ञ सहभागी होणार असल्याने या आजाराशी संबंधित रुग्णांची तपासणी व त्यांना मार्गदर्शन केले जाईल. हे शिबिर सर्वांसाठी खुले असून रुग्णांची नोंदणी शिबिराच्या ठिकाणीच दुपारी १ वाजेपर्यंत होईल. बुटीबोरी व आजूबाजूच्या गावातील महिला, पुरुष यांनी या सुवर्णसंधीचा जास्तीतजास्त लाभ घ्यावा, असे आवाहन लोकमत व जैन सहेली मंडळातर्फे करण्यात आले आहे. नोंदणी व अधिक माहितीसाठी लोकमत भवन, रामदासपेठ येथे किंवा ९९२२९१५०३५, ९८८१७४९३९०, ९८२२४०६५६२ यावर संपर्क साधावा.
या तपासण्या होतील हिमोग्लोबिन ४अस्थमाचष्म्याचे नंबर ४ईसीजीरक्तदाब ४रक्तातील साखरेचे प्रमाण
या तज्ज्ञाचा सहभागशिबिरात महिला, पुरुष व बालकांसाठी वैद्यकीयतज्ज्ञ, हृदयरोगतज्ज्ञ, अस्थिव्यंगोपचारतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, कर्करोगतज्ज्ञ , हृदयरोग तज्ज्ञ, नेत्ररोगतज्ज्ञ, नाक, कना व घसातज्ज्ञ, त्वचारोगतज्ज्ञ, श्वसन रोगतज्ज्ञ आणि दंतरोग तज्ज्ञांचा समावेश असणार आहे.
स्तन कर्करोगाची तपासणीस्तनाच्या कर्करोगाचे शून्य ते पहिल्या स्टेजमध्येच निदान झाल्यास तो बरा होऊ शकतो. या शिबिरात उपकरणाद्वारे स्तन कर्करोगाची तपासणी केली जाणार आहे.