जलालखेडा : स्थानिक एस.आर.के. इंडाे पब्लिक स्कूल येथे अत्यंत साध्या पद्धतीने महिला दिन साजरा करण्यात आला. क्रांतिज्याेती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला प्राचार्य शुभांगी अर्डक यांनी माल्यार्पण केले. यावेळी ग्रा.पं. सदस्य प्रतिभा कवरे, प्रियंका देशमुख, नलिनी जीवताेड, सरिता वाडबुधे आदी उपस्थित हाेते.
....
महाराष्ट्र अंनिस शाखा रामटेक
रामटेक : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा रामटेकच्या वतीने मनसर येथील वृद्धाश्रमात महिला दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त वृद्धाश्रमातील सर्व ज्येष्ठांची काळजी घेणाऱ्या करुणा कैलास रामटेके यांचा अंनिसतर्फे शाल, प्रमाणपत्र देऊन गाैरव करण्यात आला. वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना नाश्त्याचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा महिला कार्यवाह अर्चना मेश्राम, रामटेक शाखा अध्यक्ष विनीता आष्टनकर, उपाध्यक्ष कांचन धानोरे, कार्याध्यक्ष दीपा चव्हाण, शुभा थूलकर, ममता चौधरी, नीलिमा भगत आदी उपस्थित हाेत्या.
...
महिला पाेलीस कर्मचाऱ्यांचा गाैरव
कामठी : जागतिक महिला दिनानिमित्त जुनी व नवीन कामठी पाेलीस ठाण्यात कार्यरत महिला पाेलीस कर्मचाऱ्यांचा गाैरव करण्यात आला. जुनी कामठी पोलीस ठाण्यात पाेलीस निरीक्षक विजय मालचे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी नगरसेविका सुषमा सिलाम, किरण मेश्राम, शीतल वंजारी, मीनाक्षी कांबळे, सुधा राऊत, अवंतिका रामटेके, सुषमा उके, रत्नमाला बोरकर, सारिका मलिक, रिना कुंभारे आदी उपस्थित होत्या. पाहुण्यांच्या हस्ते उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दीप्ती बांते, अश्विनी मानवटकर, स्वाती चेटोले, मनीषा मानकर, ज्योती सहारे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन शैलेश यादव यांनी तर आभार सुचित गजभिये यांनी मानले. तसेच नवीन कामठी ठाणे येथे ठाणेदार संजय मेंढे यांच्या अध्यक्षतेखाली नगरसेविका संध्या रायबोले, शीतल चौधरी, माजी जि.प. सदस्य संगीता रंगारी, मुन्नी ठाकूर, सुजाता कुर्वे, अर्चना वासनिक यांच्या उपस्थितीत महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी पाेलीस कर्मचारी कचलता मडावी, सपना राणे, मनिषा माहुरे यांना गाैरविण्यात आले. संचालन मयूर बन्साेड यांनी तर आभार शाहिद शेख यांनी मानले.
....
भाजयुमाेतर्फे महिलांचा सत्कार
जलालखेडा : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भाजपा युवा माेर्चाच्या वतीने विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. काेराेना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता घराेघरी जाऊन सेवा देणाऱ्या आशा वर्कर, महिला पाेलीस कर्मचाऱ्यांना साडी देऊन गाैरवान्वित करण्यात आले. प्राथमिक आराेग्य केंद्र येथे आशा वर्कर कलावती रेवतकर, प्रतिभा कळंबे, मंदा सातपुते, जयश्री निकोसे, मेंढला येथील नंदा इंगळे, संगीता लोखंडे
तसेच पोलीस स्टेशन जलालखेडा येथे कार्यरत महिला पाेलीस कर्मचारी सुलोचना दुपारे, वंदना मोहोड यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मयूर दंढारे, अक्षय वीरखडे, नितीन बोकडे, रविकुमार मुरोडिया, सुषमा राऊत, ठाणेदार मंगेश काळे, किशोर कांडेलकर, शंकर आचट आदी उपस्थित हाेते.