आॅनलाईन लोकमतनागपूर : नागपूर व विदर्भातील संत्र्याचे भारताच्या तसेच जगाच्या कानाकोपऱ्यात ‘ब्रॅण्डिंग’ व्हावे व सोबतच येथील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांवर फोकस करून त्यांना नव्या तंत्रज्ञानाची माहिती उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नागपुरात १६, १७ व १८ डिसेंबर रोजी ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’ आयोजित करण्यात येत आहे. या फेस्टिव्हलमध्ये संत्र्याविषयीचे देश-विदेशातील तज्ज्ञ, उत्पादक सहभागी होतील. या क्षेत्रात रोजगार आणि पर्यटनाची संधी, संत्र्याचे मार्केटिंग यावर विचारांचे आदान-प्रदान होऊन शेतकऱ्यांच्या समृद्धीचा नवा मार्ग तयार होईल.
भरगच्च सांस्कृतिक मेजवानीमहोत्सवात प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांचे गायन होईल. प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचे दिलखेचक नृत्य, बॉलिवूडचे आघाडीचे गायक बेनी दयाल यांचा ‘लाईव्ह कॉन्सर्ट’ होईल. याशिवाय युरोप, आफ्रिका, आशिया खंडातून कलाकार येऊन आपली कला सादर करतील. नागपूरकरांसाठी ही एक सांस्कृतिक मेजवानी असेल. क्रीडा संकुल (मानकापूर), ट्रॅफिक चिल्ड्रेन पार्क, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र या प्रमुख ठिकाणी कार्यक्रम होतील.याशिवाय शहरातीत महत्त्वाच्या ठिकाणी ‘मोबाईल स्टेज’च्या माध्यमातून कलाकार आपली कला सादर करतील. त्यामुळे शहराच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या नागपूरकरांना या महोत्सवाचा आनंद लुटला येर्ईल. महोत्सवादरम्यान जे.जे. स्कूल आॅफ आर्ट, मुंबई व नागपूरचे कलाकार मिळून नागपुरात विविध ठिकाणी संत्राविषयक इन्स्टॉलेशन उभारतील. संत्र्यापासून तयार केलेला ताजमहाल, संत्र्यापासून साकारलेली शेतकरी महिला आदी कलाकृती लक्षवेधी ठरतील.या महोत्सवात होणारी ‘कार्निव्हल परेड’ ही महोत्सवाचा सर्वोच्च बिंदू असेल. यात नागपूरचे कलाकार सहभागी होतील. फिटनेस प्रोग्रामही आयोजित केले जातील. एकूणच महोत्सवातील तीन दिवस नागपूरकरांसाठी कार्यक्रमांची रेचलेच असेल.
संत्र्यापासून तयार होणाऱ्या रेसिपी शिकाप्रसिद्ध मास्टर शेफ विकी रत्नानी हे संत्र्यापासून देशभरात तयार होणाऱ्या विविध रेसिपीची माहिती देतील. तर टी.व्ही. स्टार प्रसिद्ध आॅस्ट्रेलियन मास्टर शेफ सारा टोड जगभरात संत्र्यापासून तयार होणाऱ्या रेसिपी कशा बनवायच्या याचे प्रात्यक्षिक सादर करतील. त्यामुळे अनेकांसाठी संत्रा रेसिपी शिकण्याची ही एक मोठी संधी असेल.नागपूर शहराने जगासाठी आयोजित केलेला हा महोत्सव आहे. या महोत्सवाला शाळा, महाविद्यालये, संस्था, संघटनांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आपणा सर्वांना मिळून तो यशस्वी करायचा असून नागपूरचे नाव जगाच्या नकाशावर न्यायचे आहे. या महोत्सवाच्या यशस्वीतेसोबतच येत्या काही वर्षात ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल नागपूर’ची जगाच्या इव्हेंट कॅलेंडरमध्ये प्रकर्षाने नोंद होईल व देशविदेशातील पर्यटक यात सहभागी होण्यासाठी रीघ लावतील, यात शंका नाही. महोत्सवात आयोजित प्रदर्शनीत स्टॉलसाठी लोकमत कार्यालयाशी संपर्क साधता येईल.अधिक माहितीसाठी पुढील लिंक्सवर संपर्क साधावा.
Facebook.com/worldorangefestival, Twitter.com/worldorangefest, instagram.com/worldorangefestival