लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर रेल्वेस्थानकावर शनिवारी रात्री ३.२० वाजताच्या दरम्यान पेट्रोलने भरलेल्या मालगाडीच्या वॅगनला अचानक आग लागली. वेळीच या आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन विभागाला यश आले, अन्यथा अख्खे नागपूर रेल्वेस्थानक जळून खाक होण्याची शक्यता होती. सुरुवातीच्या रेल्वेस्थानकावर बेजबाबदारपणा झाल्यामुळे या वॅगनचे झाकण उघडे राहिल्यामुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी चौकशी समिती गठीत करण्यात आली असून समितीचा अहवाल आल्यानंतरच आगीचे खरे कारण कळू शकणार आहे.रेल्वे सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीकानेरवरून ५० वॅगनची एक मालगाडी पेट्रोल घेऊन विजयवाडाकडे जात होती. ही गाडी शनिवारी रात्री ३.२० वाजता नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक १ आणि २ मधील लुपलाईनवर आली. मालगाडीच्या इंजिनपासून दहाव्या क्रमांकाच्या वॅगनला (वॅगन क्रमांक-डब्ल्यूआर ४७०८१२१४०७०) ला अचानक आग लागली. वॅगनच्या वरील झाकणातून आगीचे लोळ निघताना दिसत होते. याबाबत उपस्टेशन व्यवस्थापक कार्यालयाला माहिती मिळाली. घटनेची माहिती मिळताच नागपूर विभागातील अधिकाऱ्यांनी त्वरीत अग्निशमन विभागाला पाचारण केले. सिव्हील लाईन्स आणि गंजीपेठ येथील अग्शिशमन विभागाच्या गाड्या त्वरीत रेल्वेस्थानकावर पोहोचल्या. अग्निशमन विभागाच्या कर्मचाºयांनी फोमच्या (केमिकल) साह्याने आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरु केले. अखेर ४.४५ वाजता आगीवर नियंत्रण मिळविण्यात त्यांना यश आले. त्यानंतर ही मालगाडी अजनी यार्डात नेऊन उभी करण्यात आली. तेथे बारकाईने मालगाडीची तपासणी करण्यात आली. दुपारपर्यंत रेल्वेचे अधिकारी मालगाडीबाबत माहिती घेताना दिसले.२००९ मध्ये घडली होती घटनानागपूर रेल्वेस्थानकावर पेट्रोलने भरलेल्या मालगाडीला आग लागण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी ६ मार्च २००९ ला पेट्रोलने भरलेल्या मालगाडीच्या वॅगनला आग लागली होती. त्या वेळी आरपीएफचा जवान प्रमोद दैने, तुषार विघ्ने यांच्यासह जवानांनी कर्तव्यदक्षता दाखविली होती. ओएचई तारेतील विद्युत प्रवाह बंद करून उद्घोषणा प्रणालीच्या माध्यमातून प्लॅटफार्म क्रमांक १ आणि २ वरील प्रवाशांना दुसरीकडे हलविण्यात आले होते. रेल्वेगाड्यांचे आवागमनही अजनी आणि गोधणी रेल्वेस्थानकावर थांबविण्यात आले होते. त्यावेळीही एक मोठी दुर्घटना टळली होती.निष्काळजीपणा झाल्याची शंकारेल्वे तज्ज्ञांच्या मते पेट्रोलच्या वॅगनमध्ये दोन झाकणे असतात. यात आतील आणि बाहेरील झाकणांचा समावेश आहे. प्राथमिकदृष्ट्या हे मानण्यात येत आहे की बिकानेरमध्ये पेट्रोलने भरलेल्या मालगाडीच्या वॅगनचे वरील झाकण योग्यरित्या बंद केले नव्हते. त्यामुळे प्रवासात झाकणाचे सील तुटले आणि ते उघडले. यामुळे ओएचई तार आणि वॅगनच्या दरम्यान संपर्क आला आणि शॉट सर्किटमुळे आग लागली असावी. परंतु चौकशीनंतरच आगीचे खरे कारण समजू शकणार आहे.दोन दिवसात येणार चौकशीचा अहवाल‘बिकानेरवरून विजयवाडाला जात असलेल्या मालगाडीच्या एका वॅगनला रात्री आग लागली होती. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातर्फे या घटनेची प्राथमिक तपासणी करण्यात येत आहे. चौकशीचा अहवाल आगामी दोन दिवसात बिकानेर आणि विजयवाडाच्या रेल्वे प्रशासनाला देण्यात येईल त्यानंतर घटनेची चौकशी करण्यात येईल.’-कुश किशोर मिश्र, सिनिअर डीसीएम, मध्य रेल्वे नागपूर विभाग
...तर संपूर्ण नागपूर रेल्वे स्थानक खाक झालं असतं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2018 3:00 PM
नागपूर रेल्वेस्थानकावर शनिवारी रात्री ३.२० वाजताच्या दरम्यान पेट्रोलने भरलेल्या मालगाडीच्या वॅगनला अचानक आग लागली. वेळीच या आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन विभागाला यश आले, अन्यथा अख्खे नागपूर रेल्वेस्थानक जळून खाक होण्याची शक्यता होती.
ठळक मुद्देपेट्रोलने भरलेल्या वॅगनला आगमोठी दुर्घटना टळलीअग्नीशमन विभागाने मिळविले आगीवर नियंत्रण