लोकमत न्यूज नेटवर्क सुमेध वाघमारेनागपूर : मोठ्यांच्या व्यसनाकडे आकर्षित झालेले अबोध मन, जाहिरातींचा प्रभाव, संगतीचा परिणाम, सहजपणे उपलब्ध होणारे तंबाखूजन्य पदार्थ आणि एकदा चव घेण्याचा मोह आदी कारणांमुळे सातवी ते पदवीच्या विद्यार्थ्यांमध्ये खर्रा व तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनाचे प्रमाण वाढत असल्याचे आढळून आले आहे. शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाने गडचिरोली जिल्ह्यातील ३५ शाळांमधील ५४९७ विद्यार्थ्यांची तपासणी केली असता तब्बल ८३४ विद्यार्थ्यांना मुखपूर्व कर्करोग असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.राज्यात तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी आहे. परंतु विदर्भाच्या गावखेड्यांपासून ते शहरातील गल्लीबोळातील अनेक छोट्या-मोठ्या चौकातील पानठेल्यांवर व आता किराणा दुकानातही तंबाखूजन्य पदार्थ विशेषत: खर्रा सहज मिळतो. पूर्वी ‘पानां’साठी प्रसिद्ध असलेले पानठेले आता खर्रा, गुटखासाठी प्रसिद्ध आहेत. या पानठेल्यांमधून दिवसभर खर्रा घोटणारी तरुणाई दिसून येते. अनेक पानठेल्यांमध्ये तर खर्रा घोटण्यासाठी आधुनिक यंत्रही बसविण्यात आले आहे. तोंडात खºर्याचा बोकणा आणि जागोजागी उडणाऱ्या त्याच्या लाल पिचकाºयाचे ‘परिणाम’ मात्र, आता दिसून येऊ लागले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या चमूने दोन टप्प्यात विद्यार्थ्यांची तपासणी केली. यात गडचिरोली शहरातील सहा शाळांमधील २१५०, रांगी गावातील सात शाळांमधील ९९७, मुरुम गावातील सहा शाळांमधील १०३५, मार्कंडदेव तहसीलमधील आठ शाळांमधील ६१२ तर भाकरोंडी गावातील सहा शाळांमधील ७०३ विद्यार्थी असे एकूण ३४ शाळांमधील ५४९७ विद्यार्थ्यांची दंत व तोंडाची चाचणी करण्यात आली. यात ८३४ विद्यार्थ्यांना मुखपूर्व कर्करोगाची लक्षणे दिसून आली. टक्केवारीनुसार १५.१७ टक्के विद्यार्थ्यांनी वेळीच उपचार घेतला नाहीतर त्यांना भविष्यात मुख कर्करोग होण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे, पाचवी ते पदवीपर्यंतच्या ९५ टक्के विद्यार्थ्यांना तंबाखू व खºर्याचे व्यसन असल्याची बाब उघडकीस आली आहे.२२७ विद्यार्थिनींना मुखपूर्व कर्करोगमुखपूर्व कर्करोगाच्या ८३४ विद्यार्थ्यांमध्ये ५५७ मुले असून २२७ मुली आहेत. ५.४ टक्के मुलींमध्ये कमी वयात तंबाखूचे व्यसन जडल्याने हे विद्यार्थी मुखपूर्व कर्करोगाच्या वाटेवर आहेत. तातडीने उपचार न मिळाल्यास हे विद्यार्थी कर्करोगाच्या विळख्यात सापडण्याची भीती डॉक्टरांनी वर्तवली आहे.
५४९७ मधून ८३४ विद्यार्थ्यांना मुखपूर्व कर्करोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 9:11 PM
मोठ्यांच्या व्यसनाकडे आकर्षित झालेले अबोध मन, जाहिरातींचा प्रभाव, संगतीचा परिणाम, सहजपणे उपलब्ध होणारे तंबाखूजन्य पदार्थ आणि एकदा चव घेण्याचा मोह आदी कारणांमुळे सातवी ते पदवीच्या विद्यार्थ्यांमध्ये खर्रा व तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनाचे प्रमाण वाढत असल्याचे आढळून आले आहे. शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाने गडचिरोली जिल्ह्यातील ३५ शाळांमधील ५४९७ विद्यार्थ्यांची तपासणी केली असता तब्बल ८३४ विद्यार्थ्यांना मुखपूर्व कर्करोग असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
ठळक मुद्देगडचिरोली जिल्ह्यातील धक्कादायक स्थिती : तंबाखू, खऱ्र्याचे व्यसन ठरतेय जीवघेणेजागतिक तंबाखूविरोधी दिन