लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनामुळे सर्वांवरच संकट कोसळले आहे. यातच एका युवतीने खासगी नोकरीसाठी प्रयत्न केला. परंतु वडिलांनी विरोध केला. यामुळे ती संतापली. रागाच्या भरात तिने घर सोडले. ती रेल्वेस्थानकावर पोहचली.पुणे किंवा मुंबईला जाऊन ‘जॉब’ करण्याचा निर्धार तिने केला. परंतु तेवढ्यात पोलीस कर्मचारी चंद्रशेखर मदनकर यांनी तिची विचारपूस केली. त्यानंतर तिला कुटुंबीयांकडे सोपविण्यात आले. ही घटना शुक्रवारी दुपारी नागपूर रेल्वेस्थानकावर घडली.उत्तर नागपुरातील शालिनी (काल्पनिक नाव) बारावी पास झाली. गरिबीचे चटके सहन करुनही तिने ८४ टक्के गुण मिळविले. अल्पवयीन असलेल्या शालिनीच्या कुटुंबात आई, वडील, दोन लहान भाऊ आहेत. वडील खासगी काम करतात. घरची परिस्थिती बिकट असल्यामुळे शालिनी कामाच्या शोधात घराबाहेर पडली. कामही मिळाले होते. परंतु शालिनीने कामाला जाण्यासाठी वडिलांचा विरोध होता. यावरून शालिनी आणि वडील यांच्यात वाद व्हायचा. शुक्रवारी सुध्दा याच विषयावरून वाद झाला. तिच्या मनात राग होताच. शुक्रवारी सकाळी मी जाते, एवढेच सांगून ती घराबाहेर पडली. महाविद्यालयात जात असावी, असे आईला वाटले. मात्र, बराच वेळ होऊनही ती परतली नाही. शालिनी महाविद्यालयात गेली. महत्वाचे कागदपत्र घेतले आणि पायीच रेल्वे स्थानकाच्या दिशेने निघाली. दुपारी २ वाजताच्या सुमारास ती रेल्वे स्थानकवर पोहोचली. तिच्या हाती एक फाईल होती. त्यात शालेय प्रमाणपत्र होते. अल्पवयीन, एकटीच आणि चिंतातूर स्थितीत असल्याचे पाहून कर्तव्यदक्ष पोलीस शिपाई चंद्रशेखर मदनकर यांना शंका आली. त्यांनी शालिनीची आस्थेनी विचारपूस केली. फाईल पाहिल्यानंतर त्यांना शंका आली. अधिक चौकशी केल्यानंतर ती रागाच्या भरात निघून जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. पोलीस उपनिरीक्षक रवी वाघ, रोशन खांडेकर, सहायक पोलीस निरीक्षक संदीप गोंडाणे यांनी तिची आस्थेनी विचारपूस केली. तिची समजूत घातली. तिच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर सायंकाळी तिची आई लोहमार्ग पोलीस ठाण्यात पोहोचली. त्यानंतर शालिनीला कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले.
संतापाच्या भरात युवतीने सोडले घर : लोहमार्ग पोलिसांनी घेतली काळजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 10:47 PM
कोरोनामुळे सर्वांवरच संकट कोसळले आहे. यातच एका युवतीने खासगी नोकरीसाठी प्रयत्न केला. परंतु वडिलांनी विरोध केला. यामुळे ती संतापली. रागाच्या भरात तिने घर सोडले. ती रेल्वेस्थानकावर पोहचली.
ठळक मुद्देमुंबई, पुण्याला ‘जॉब’ करण्याचा घेतला होता निर्णय