शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

शिक्षक, अंगणवाडीसेविका शोधणार शाळाबाह्य मुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2021 4:07 AM

नागपूर : शिक्षण हक्क कायदा २००९ अन्वये ६ ते १४ वयोगटांतील प्रत्येक बालक शाळेच्या पटावर नोंदविला जाणे, नियमित ...

नागपूर : शिक्षण हक्क कायदा २००९ अन्वये ६ ते १४ वयोगटांतील प्रत्येक बालक शाळेच्या पटावर नोंदविला जाणे, नियमित शाळेत येणे व त्याला दर्जेदार शिक्षण मिळणे हा बालकांचा हक्क आहेत, पण स्थलांतर करणाऱ्या कुटुंबीयांची मुले, गावाबाहेरच्या वस्त्यांमध्ये राहणारी मुले अजूनही शाळाबाह्यच आहे. या संदर्भात २०१५ मध्ये महासर्वेक्षण झाले होते. त्यानंतर, टप्प्याटप्प्याने शासनाला वाटेल, तेव्हा सर्वेक्षण करण्यात आले. आजपासून पुन्हा शाळाबाह्य विद्यार्थ्यांची शोधमोहिमेला सुरुवात होणार आहे. शासन निर्णयात यासाठी वेगवेगळ्या विभागाचा सहभाग घेण्याचा उल्लेख आहे, पण ही मोहीम शिक्षक व अंगणवाडीसेविका मदतनीस यांच्यावरच खऱ्या अर्थाने सोपविली आहे.

शाळाबाह्य बालकांची ही शोधमोहीम १ ते १० मार्च या कालावधीत करायची आहे. कोरोनाचे संक्रमण पसरू नये, म्हणून सरकारने लॉकडाऊन केल्यानंतर मोठ्या प्रमाणात स्थलांतरण झाले. त्यात ६ ते १८ वयोगटांतील अनेक बालके शाळाबाह्य झाल्याचे शासनाच्या निदर्शनास आले. त्यासाठी कुटुंबाचे सर्वेक्षण करण्याबरोबरच सर्वेक्षकांना गजबजलेल्या वस्त्या, रेल्वे स्टेशन, बसस्थानके, गावाबाहेरची पाल, वीटभट्ट्या, दगडखाणी, मोठी बांधकामे, स्थलांतरीय कुटुंब, झोपड्या, फुटपाथ, सिग्नल व रेल्वेमध्ये वस्तू विकणारी मुले, भीक मागणारी मुले, लोककलावंतांच्या वस्त्या, अस्थायी निवारा असणारी कुटुंब, भटक्या जमाती, तेंदूपत्ता वेचणारी, कामगारांच्या वस्त्या जंगलातील वास्तव्यास असलेली कुटुंब आदीपर्यंत पोहोचून बालकांचा शोध घ्यायचा आहे. शिक्षण विभागावर सर्वेक्षणाची जबाबदारी टाकली आहे. विभागाने सर्व पंचायत समितीतील बीईओंना पत्र पाठवून त्याचे नियोजन करण्याचे निर्देश दिले आहे. गावागावांत हे सर्वेक्षण होणार आहे. त्यामुळे प्रत्येक गावातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापकांना यात सहभागी करून घेतले आहे, पण या सर्वेक्षणावर शिक्षक, अंगणवाडीसेविका व सामाजिक संस्थांनीही काही आक्षेप नोंदविले आहे.

- कुठलीही कामे कधीही लावतात मागे

सध्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असल्याने एकमेकाशी संर्पक टाळणे गरजेचे आहे. या सर्वेक्षणामुळे शिक्षकांचा संपर्क मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याने कोरोना संक्रमणाची शक्यता निर्माण होऊ शकते. त्यामुळे सर्वेक्षण स्थगित करणे सोयीचे ठरेल, अशी आमची मागणी आहे.

लिलाधर ठाकरे, जिल्हाध्यक्ष,

महाराष्ट राज्य प्राथमिक शिक्षक समिती

- आम्हाला माहिती नाही

या सर्वेक्षणाबाबत आम्हाला कुठल्याही सूचना नाही. अंगणवाडीसेविकांच्या नियमावलीत काम असेल तर नक्कीच करू, असे अंगणवाडीसेविका संघटनेच्या प्रतिनिधींनी सांगितले.

- सर्वेक्षण कागदावरच दिसते

शिक्षणापासून वंचित मुलांसाठी राज्यस्तरीय काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची एक ऑनलाइन बैठक घ्यावी. अशाच बैठका प्रत्येक जिल्हा शिक्षणाधिकारी व तालुका गटशिक्षणाधिकारी यांनी त्या-त्या जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्था व कार्यकर्ते यांची घ्यावी. त्यांना सर्वेक्षणात सहभागी करावे व नियोजन करावे, पण असे काही दिसत नाही.

दीनानाथ वाघमारे, संयोजक, संघर्ष वाहिनी