न्यू कैलाशनगर येथील हे प्रकरण आहे. येथे एका घरी दोन कनेक्शन आहेत. एक कनेक्शन विद्यार्थी शेवडे यांच्या नावावर तर दुसरे त्यांचे वडील अरुण शेवडे यांच्या नावावर आहे. वडिलांच्या नावावर असलेल्या कनेक्शनवर १४ हजार रुपयाचे बिल थकीत आहे. ‘महावितरण’चे म्हणणे आहे की, घरमालक वीज कनेक्शन कापू देत नव्हते. कंपनीचे पथक तीन-चारवेळा गेली, परंतु त्यांना परत यावे लागले. अशा परिस्थितीत थेट खांबावरून लाईन डिस्कनेक्ट करण्यात आली. दुसरीकडे शेवडे यांचे म्हणणे आहे की, जेव्हापर्यंत वडील थकबाकी भरत नाही, तेव्हापर्यंत दोन्ही कनेक्शन जोडले जाणार नाही. बसपा नेते उत्तम शेवडे यांनी या घटनेचा निषेध करत नोटीस न देता वीज कापणे ही सरकारची दडपशाही आहे. त्यांचे म्हणणे आहे की, दोन महिन्यांचे बिल थकीत होते. १७ सप्टेंबरपर्यंत बिल भरण्याची तारीख होती. ते बाहेर गेले असल्याने बिल भरू शकले नाही. त्यावर महावितरणचे स्पष्ट म्हणणे आहे की, वीज कापण्याला विरोध केला नसता तर एकच कनेक्शन कापले गेले असते. ग्राहकाने वीज कापण्यास विरोध केल्याने खांबावरून कनेक्शन कापण्यात आले.
थकबाकी वडिलांवर, वीज कापली मुलाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 4:12 AM