शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"आपण *** मारायची आणि दुसऱ्याचं..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
4
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
5
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
6
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
7
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
8
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
9
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
10
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
11
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
12
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
13
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
14
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
15
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
16
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
17
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
18
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
19
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
20
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला

५००० वर प्राण्यांनी केला पेंच अभयारण्याच्या अंडरपासचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2020 11:42 AM

Pench Sanctuary Nagpur News गेल्या ९ महिन्यात वाघांसह अंडरपासमधून ५००० वर वन्यप्राण्यांनी रस्ता ओलांडला आहे. भारतीय वन्यजीव संस्थेने याठिकाणी लावलेल्या कॅमेऱ्यांच्या मदतीने हा अहवाल समोर आला आहे.

ठळक मुद्देसर्वाधिक हरीण, वाघाने केला १५१ वेळा वापर वन्यजीव संस्थेचा अहवाल

निशांत वानखेडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पेंच अभयारण्यामधून जाणाऱ्या नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर वन्यप्राण्यांचा अपघात टाळण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाने तयार केलेल अंडरपास वन्यप्राण्यांचा जीव वाचविण्यासाठी लाभदायक ठरत आहेत. गेल्या ९ महिन्यात वाघांसह अंडरपासमधून ५००० वर वन्यप्राण्यांनी रस्ता ओलांडला आहे. भारतीय वन्यजीव संस्थेने याठिकाणी लावलेल्या कॅमेऱ्यांच्या मदतीने हा अहवाल समोर आला आहे.

पेंच व्याघ्र प्रकल्पाजवळ १६ किलोमीटरच्या क्षेत्रात २५५ कोटी रुपये खर्च करून चार लहान पूल व पाच अंडरपास तयार करण्यात आले आहेत. राष्ट्रीय महामार्गावर वेगाने धावणाऱ्या वाहनांखाली येऊन वन्यप्राणी मृत्युमुखी पडण्याच्या घटना नेहमीच घडत असतात. या अभयारण्यातून जाणाऱ्या महामार्गावर ही समस्या कायम होती. यात मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये वाघ आणि बिबट्यांची संख्या मोठी आहे. वन्यप्राण्यांना सुरक्षितरीत्या रस्ता ओलांडता यावा याकरिता हे अंडरपास बनविण्यात आले आहेत. वन्यप्राण्यांसाठी केली गेलेली ही देशातील सर्वात मोठी खबरदारीची उपाययोजना आहे. यामधून प्राण्यांच्या हालचाली टिपण्यासाठी भारतीय वन्यजीव संस्थेने ७८ कॅमेरे लावले आहेत. यातून वन्यप्राण्यांच्या तब्बल १ लाख ३२ हजार ५३२ छायाचित्र टिपण्यात आले आहेत. संस्थेच्या अहवालानुसार सर्व अंडरपासमधून ५२९५ वन्यप्राण्यांनी रस्ता ओलांडला आहे.

या अंडरपासचा सर्वाधिक ३३२४ वेळा हरणांनी वापर केला आहे. वाघांनी १५१ वेळा अंडरपासमधून रस्ता ओलांडला आहे. यात ११ स्वतंत्र वाघांची नोंद करण्यात आली आहे. याशिवाय रानडुक्कर ७०८ वेळा, ससे ३३९ वेळा, रानमांजर २३६ वेळा, रानकुत्र्यांनी २८१ वेळा अंडरपासचा वापर करून रस्ता ओलांडल्याचे अहवालात नमूद आहे. यांसह नीलगाय, सांबर, गौर, मुंगूस, साळींदर, वाघाटी, उदमांजर, कोल्हे, बिबट अशा एकूण १७ प्रजातींनी अंडरपासचा उपयोग करून रस्ता ओलांडला.

कॅम्पातर्फे ३.५० कोटीवन्यप्राण्यांच्या संवर्धनासाठी आणखी काय उपाययोजना करता येतील याविषयी अभ्यासाची जबाबदारी डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थेकडे सोपवण्यात आली. याअंतर्गत कॅम्पातर्फे साडेतीन कोटी रुपये मंजूर करण्यात आले असल्याची माहिती पेंचचे क्षेत्र संचालक व मुख्य वनसंरक्षक रविकिरण गोवेकर यांनी दिली. याअंतर्गत वाघांसाठी पायवाट करणे, रस्त्याचे बॅरिकेड काढण्यात यावे, चेकपोस्ट तयार करणे, फेन्सिंग, अंडरपासच्या पिलरना कॅमाफ्लॉज (जंगली रंग) देणे, पाणवठे तयार करणे आदी उपाययोजना सुचविण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

 

टॅग्स :wildlifeवन्यजीव