शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

वर्षभरात बँकांमध्ये झाले ६७ हजार कोटींचे घोटाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2019 12:18 AM

देशातील विविध बँकांमध्ये मागील आर्थिक वर्षामध्ये थोडेथोडके नव्हे ५९ हजारांहून अधिक घोटाळे झाले. घोटाळ्यांची रक्कम ही ६७ हजार कोटींहून अधिक होती.माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देहजार कोटींच्या घोटाळ्यात कर्मचारीच सहभागी : ‘कार्ड’ घोटाळ्यात १४५ कोटींचे नुकसान

 लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : देशातील विविध बँकांमध्ये मागील आर्थिक वर्षामध्ये थोडेथोडके नव्हे ५९ हजारांहून अधिक घोटाळे झाले. घोटाळ्यांची रक्कम ही ६७ हजार कोटींहून अधिक होती. आश्चर्याची बाब म्हणजे यातील हजार कोटींचे घोटाळे तर बँक कर्मचाऱ्यांनीच केले होते. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’कडे विचारणा केली होती. १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत देशभरातील बँकांमध्ये एकूण किती घोटाळे झाले, यात किती रकमेचा समावेश होता, किती घोटाळ्यात बँक कर्मचाऱ्यांचा समावेश होता, ‘सायबर’ घोटाळ्यांची संख्या किती होती, इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’कडून प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार २०१८-२०१९ या आर्थिक वर्षात देशभरातील बँकांमध्ये झालेले एकूण ५९ हजार ८२६ घोटाळे उघडकीस आले. यात ६७ हजार ४२३ कोटी २६ लाख रुपयांच्या निधीचा समावेश होता.कर्मचाऱ्यांवरील कारवाईची माहितीच नाहीबँकामधील एकूण गैरव्यवहारांपैकी ४ हजार २६९ घोटाळ्यांमध्ये बँकांच्या कर्मचाऱ्यांचा प्रत्यक्ष समावेश होता. ही रक्कम १ हजार १४ कोटी ९७ लाख इतकी होती. परंतु या कर्मचाऱ्यांवर नेमकी कुठली कारवाई करण्यात आली याची कुठलीही माहिती ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’कडे उपलब्ध नाही.‘एटीएम कार्ड’शी संबंधित १९ हजार घोटाळेदरम्यान, ‘एटीएम कार्ड’, ‘क्रेडिट कार्ड’ व ‘इंटरनेट बँकिंग’शी संबंधित एकूण ५० हजार ५४७ घोटाळे समोर आले. यात ग्राहकांचे १४५ कोटी ८ लाख रुपयांचे नुकसान झाले. एकट्या ‘एटीएम कार्ड’शी संंबंधित १९ हजार ८१८ घोटाळ्यांचा समावेश होता व यात ५८ कोटी ३८ लाखांची रक्कम गायब झाली. ‘इंटरनेट बँकिंग’शी संंबंधित ५ हजार २५८ घोटाळे समोर आले व १६ कोटी ९४ लाख रुपयांचे नुकसान झाले. ही रक्कम ग्राहकांना परत करण्यात आली की नाही याची कुठलीही माहिती ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’कडे उपलब्ध नाही. आश्चर्याची बाब म्हणजे ‘सायबर’ गुन्हे वाढीस लागले असता बँकेकडे याची वेगळी आकडेवारीदेखील नाही.अशी आहे ‘कार्ड’ घोटाळ्याची आकडेवारीघोटाळा            एकूण संख्या           रक्कम (कोटींमध्ये)डेबिट कार्ड्स    १९,८१८                 ५८.३८क्रेडीट कार्ड्स  २५,४७१                ६९.७६इंटरनेट बँकिंग ५,२५८                  १६.९४

टॅग्स :bankबँकfraudधोकेबाजीRight to Information actमाहिती अधिकारRTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ता