शहरं
Join us  
Trending Stories
1
"वंदे मारतमरला विरोध करणाऱ्या व्यक्तीला आमदार केलं"; राऊत म्हणाले, "फडणवीस कुठेत?"
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीला साताऱ्यात झटका बसणार, शिंदे गटाचा बडा नेता तुतारी हाती घेणार? दिले संकेत
3
"देशाच्या काही भागात निवडणुकांची गरज नाही...", असं का म्हणाले उपराष्ट्रपती?
4
बहराइच हिंसाचार: नखं उपटली, करंट लावला आणि... रामगोपालची छळ करू हत्या, धक्कादायक माहिती समोर   
5
Lionel Messi नं साधला मोठा डाव; Cristiano Ronaldo च्या 'या' विक्रमाशी केली बरोबरी
6
एस. जयशंकर पाकिस्तानमध्ये मॉर्निंग वॉक करताना... सोशल मीडियावर फोटो शेअर करत म्हणाले...
7
महाविकास आघाडीने केले  २१५ उमेदवार निश्चित! काँग्रेसला ८४, शरद पवार गट व उद्धवसेनेला प्रत्येकी ६५ जागा
8
Baba Siddique : YouTube वर व्हिडीओ पाहिले, पिस्तूल चालवायला शिकले; बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात नवा खुलासा
9
Video - "मी तुम्हाला मत दिलं, आता माझं लग्न लावून द्या..."; कर्मचाऱ्याने थेट आमदारालाच सांगितलं
10
Kojagiri Purnima 2024: कोजागरीच्या रात्री कशी करावी लक्ष्मी आणि चंद्राची पुजा? शास्त्रोक्त पद्धत जाणून घ्या!
11
"शिंदेंना CM करायचे नाही"; BJP ने हकालपट्टी करताच माजी आमदार म्हणाले, "आता कॉम्प्रमाईज..."
12
गजकेसरी महालक्ष्मी योग: ८ राशींना बंपर लाभ, शेअर बाजारात नफा; दिवाळीत ऐश्वर्य-वैभव वृद्धी!
13
BSE Ltd च्या शेअरमध्ये मोठी घसरण, 'या' दिग्गज ब्रोकरेजनं कमी केलं रेटिंग; म्हणाले...
14
kojagiri Purnima 2024: कोजागरीला 'कोss जागर्ति' म्हणत लक्ष्मी माता खरंच येते का? वाचा जागरणाचे महत्त्व!
15
सोलार कंपनीचा IPO येणार, GMP मध्ये आतापासूनच ₹१२८० चा फायदा; काय आहे प्राईज बँड?
16
IND vs NZ : बंगळुरुमध्ये पावसाची बॅटिंग; पहिल्या दिवसाचा खेळ पाण्यात?
17
Hyundai IPO कडे गुंतवणूकदारांची पाठ, पहिल्या दिवशी १८% सबस्क्राईब; काय करावं?
18
राज्यात एकाच टप्प्यात सत्तेचा फैसला, असा आहे निवडणूक कार्यक्रम; दिवाळीच्या आधी आणि नंतरही वाजणार प्रचाराचे फटाके
19
नांदेड, वायनाडसाठी हाेणार पोटनिवडणूक; विधानसभेच्या ४८ जागांसाठीही लढत
20
आजचे राशीभविष्य : आज आर्थिक व्यवहार टाळावेत, अधिक लाभाच्या हव्यासापोटी नुकसान होण्याची शक्यता

चार वर्षात धावत्या रेल्वेने घेतला सातशेवर जणांची बळी; चार वर्षांची धक्कादायक आकडेवारी

By नरेश डोंगरे | Published: May 06, 2023 6:47 PM

Nagpur News अपघात, आत्महत्या तसेच विविध कारणामुळे नागपूर जिल्ह्यात धावत्या रेल्वेने गेल्या चार वर्षात सातशेवर जणांचा बळी घेतला. यातील सर्वाधिक मृत्यूची संख्या २०२२ मधील आहे.

नागपूर : अपघात, आत्महत्या तसेच विविध कारणामुळे नागपूर जिल्ह्यात धावत्या रेल्वेने गेल्या चार वर्षात सातशेवर जणांचा बळी घेतला. यातील सर्वाधिक मृत्यूची संख्या २०२२ मधील आहे.

गेल्या वर्षी रेल्वेची धडक बसल्यामुळे, रेल्वे खाली झोकून दिल्यामुळे, कुणाला रेल्वे समोर ढकलून दिल्यामुळे तर कुणाचा तोल जाऊन पडल्यामुळे एकूण २९८ जणांचा बळी गेला. अशाच प्रकारे वेगवेगळ्या कारणामुळे रेल्वेने ठार झालेल्यांची माहिती आरटीआय कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यातून सन २०२० ते २०२३ पर्यंत चार वर्षाची माहिती पुढे आली. त्यातून उघड झालेला मृत्यूचा आकडा धक्कादायक आहे.

सन २०२० मध्ये विविध कारणामुळे रेल्वेने ठार झालेल्यांची संख्या १५५ आहे. २०२१ मध्ये १९० जणांचा मृत्यू झाला. तर २०२२ मध्ये हा आकडा २९८ वर पोहोचला. २०२३ मार्च अखेर पर्यंत नागपूर विभागात तब्बल ६५ व्यक्तींचा रेल्वेमुळे मृत्यू झाल्याची अधिकृत नोंद आहे. गेल्या चार वर्षातील ही आकडेवारी बघता रेल्वेने ठार होणाऱ्यांची संख्या दरवर्षी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसून येते. 

रेल्वे लाईन ओलांडताना सर्वाधिक मृत्यूरेल्वे पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या रेल्वेशी संबंधित प्रकरणात सर्वाधिक मृत्यू रेल्वे रुळ ओलांडताना झाल्याचे नमूद आहे. रुळ ओलांडताना मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १५७ आहे. त्यातील २०२० आणि २०२१ ला प्रत्येकी ४६ असे एकूण ९२ मृत्यू झाले. २०२२ मध्ये ५३ जणांचे तर ३१ मार्च २०२३ पर्यंत १२ जणांच्या मृत्यूचा समावेश आहे.

११० जणांची आत्महत्या

रेल्वेसमोर स्वत:ला झोकून देऊन चार वर्षांत ११० जणांनी आत्महत्या केली. त्यात २०२० मध्ये २७, २०२१ मध्ये २९, २०२२ मध्ये ४४ तर ३१ मार्च २०२३ पर्यंत १० जणांनी आत्महत्या केल्याचे रेल्वेच्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. 

मुंबई-पुण्यासारखी स्टंटबाजी नाहीमुंबई, पुण्याकडे रेल्वेतून स्टंटबाजी करताना अपघात घडतो आणि अनेक जण त्यात प्राण गमावतात. नागपूर जिल्ह्यात गेल्या चार वर्षांत अशा प्रकारची एकही घटना घडलेली नाही. नागपूर जिल्ह्यात रेल्वेतून कुणी स्टंटबाजी करताना अपघात झाल्याची नोंद नाही. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेAccidentअपघात