दुसरा संदेश सफरीना या तरुणीचा आहे. तिनेही संताप व्यक्त केला. भविष्य वाचवायचे असेल तर झाडे वाचावावीच लागतील. नागपूर शहर प्रदूषित झाल्यानंतर जागे होण्यात अर्थ नाही. आताही वेळ गेली नाही. नागपूरकरांनो जागे व्हा, असे आवाहन करीत सरकारने हा प्रकल्प मागे घ्यावा, अशी विनंतीही केली आहे.
मनपा म्हणाले, सर्वेक्षणाला महिना लागेल
प्रकल्प उभारणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने प्रकल्पासाठी १९०० झाडे कापण्याची परवानगी महापालिकेकडे मागितली आहे. त्यानुसार महापालिकेच्या उद्यान विभागाने या भागात सर्वेक्षण सुरू केले आहे. मात्र एनएचएआयने केलेला १९०० झाडांचा दावा मनपाने फाेल ठरवला. येथे केवळ १९०० नव्हे तर ७००० हून अधिक झाडे आहेत, असे स्पष्ट केले. या पूर्ण परिसराचे सर्वेक्षण करायला किमान एक महिना तरी लागेल, असे मनपाने स्पष्ट केले आहे.
आदित्य ठाकरे यांनी लक्ष घालण्याची मागणी
मुंबइतील आरेचे जंगल वाचविण्यासाठी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी महत्त्वाची भूमिका घेतली हाेती. त्यामुळे त्यांनी अजनी वन वाचविण्यासाठीही लक्ष घालावे, अशी मागणी पर्यावरणवाद्यांनी केली आहे. त्यांना प्रत्यक्ष निवेदन सादर करण्यात आले. याशिवाय साेशल मीडियावरूनही वारंवार संदेश पाठविला जात आहे. अजनीबाबत त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आता लढा
आपले पर्यावरण सुरक्षित ठेवण्यासाठी वृक्ष संवर्धन करणे हाच एक उपाय आहे. असे असताना एवढ्या माेठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करण्यात अर्थ काय. भविष्यात गळ्यात ऑक्सिजनचे सिलेंडर घेउन जगायचे आहे काय. आम्ही हे हाेऊ देणार नाही. या वृक्षताेडीविराेधात लढा उभा करू.
- अनिकेत कुत्तरमारे, प्रियदर्शी सम्राट अशाेक बहुउद्देशीय संस्था