शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
6
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
7
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
8
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
9
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
10
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
11
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
12
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
13
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
14
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
15
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
16
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
17
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
18
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
19
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
20
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप

पोटच्या मुलीसोबत कुकर्म करणाऱ्या  नराधम वडिलास मरेपर्यंत जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 9:06 PM

वारंवार कुकर्म करून पिता व मुलीचे अतिशय पवित्र नाते कलंकित करणाऱ्या  एका नराधम वडिलाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विलास डोंगरे यांच्या न्यायालयाने नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत जन्मठेप आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

ठळक मुद्देनागपूरनजीकच्या कुही भागातील घटना

आॅनलाईन लोकमतनागपूर : वारंवार कुकर्म करून पिता व मुलीचे अतिशय पवित्र नाते कलंकित करणाऱ्या  एका नराधम वडिलाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विलास डोंगरे यांच्या न्यायालयाने नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत जन्मठेप आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.खटल्याची पार्श्वभूमी अशी, घटनेच्या वेळी पीडित मुलगी ही १६ वर्षांची होती. ती शेतमजुरी करायची. आई वेडी असल्याने ती कुठेतरी निघून गेली होती. त्यामुळे आरोपी वडिलाने दुसरे लग्न केले होते.नराधमाने गाठला विकृतीचा कळस२१ मार्च २०१५ रोजी पीडित मुलीची सावत्र आई आपल्या मुलांसोबत माहेरी गेली होती. त्यामुळे हा आरोपी आणि पीडित मुलगी घरी होते. आरोपी वडील रात्री जेवण करून बाहेर अंगणात बसला होता. मुलीने रात्री १० वाजताच्या सुमारास जेवण केले आणि ती घराचा दरवाजा न लावता घरात खाटेवर झोपली. त्याच वेळी नराधम पिता घरात येऊन त्याने आतून दार बंद करून घेतले होते. त्याने मुलीवर बलात्कार केला होता. कुणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकीही त्याने दिली होती. मध्यरात्रीनंतर पुन्हा त्याने बलात्कार केला होता.या घटनेच्या पूर्वी दिवाळीत या मुलीची सावत्र आई आपल्या माहेरी गेली असता, या नराधमाने पीडित मुलीवर पाच-सहा वेळा बलात्कार केला होता.अखेर अत्याचार असह्य झाल्याने तिने २२ मार्च २०१५ रोजी कुही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता पोलिसांनी भादंविच्या ३७६(२)(एन)(आय),५०६ आणि लैंगिक अपराधांपासून बालसंरक्षण कायद्याच्या (पोक्सो) कलम ४,८ अन्वये गुन्हा दाखल केला होता. त्याच दिवशी आरोपी नराधम वडिलाला अटक करण्यात आली होती. पोलीस उपनिरीक्षक एल.बी. ढेंगरे यांनी तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.न्यायालयात गुन्हा सिद्ध होऊन आरोपी वडिलाला न्यायालयाने ही शिक्षा सुनावली. पीडित मुलगी निराश्रित असल्याने तिच्या पुनर्वसनाची गरज आहे. त्यामुळे तिला अतिरिक्त नुकसान भरपाई देण्याची शिफारस न्यायालयाने सक्षम अधिकाऱ्यांकडे केली आहे.न्यायालयात सरकारच्यावतीने सहायक सरकारी वकील आसावरी पळसोदकर तर आरोपीच्यावतीने अ‍ॅड.संजय जोगेवार यांनी काम पाहिले. नागपूर ग्रामीणचे जिल्हा समन्वय अधिकारी उपनिरीक्षक डी. एन. मात्रे, सहायक फौजदार रमेश भुसारी, अरुण भुरे, प्रमोद पाटील, हेड कॉन्स्टेबल विजयानंद सांदेकर यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले.