ठळक मुद्देवैज्ञानिक, विद्यापीठांच्या कुलगुरूंशी संवाद
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवला. पुढील संकट लक्षात घेता ऑक्सिजनसंदर्भात विदर्भाला आत्मनिर्भर करण्याची गरज आहे. ऑक्सिजनअभावी कुणाचा जीव जाऊ नये यासाठी विदर्भात तालुका, नगरपरिषद तसेच विधानसभा मतदारसंघनिहाय ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बँक सुरू करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिली. विविध संस्थांमधील वैज्ञानिक तसेच विद्यापीठांच्या कुलगुरूंशी त्यांनी मंगळवारी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
कोरोनानंतर अनेकांना काळ्या बुरशीचा रोग होत आहे. त्यासाठी लागणाऱ्या एम्फोटेरेसिन-बी या इंजेक्शनचीही निर्मिती वर्ध्यात होणार आहे, अशी माहिती गडकरी यांनी दिली.