पारशिवनी : अद्ययावत सुविधा नसल्याने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था कोलमडली. ती सक्षम करण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. यासाठी सामाजिक संस्थाही पुढे आल्या आहेत.
पारशिवनी तालुक्यात श्री श्री फाउंडेशनचे अध्यक्ष संकेत बावनकुळे यांच्याहस्ते कन्हान, साटक व दहेगाव (जोशी) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन भेट देण्यात आल्या. याप्रसंगी जयराम मेहरकुळे, भाजपा पारशिवनी तालुका अध्यक्ष अतुल हजारे, अमिष रुंघे, डॉ. मनोहर पाठक, सुनील लाडेकर, जिल्हा परिषद सदस्य व्यंकटेश कारेमोरे, रिंकेश चवरे, कमलाकर मेंघर, राजेश कडू, कामेश्वर शर्मा, नगरसेवक राजेंद्र शेंद्रे, नगरसेविका वंदना कुरडकर, वर्षा लोंढे, संगीता खोब्रागडे, अनिता पाटील, तुलेशा नानवटकर, लीलाधर बर्वे, माजी नगरसेवक अजय लोंढे, सागर सायरे आदी उपस्थित होते.